सुपरस्टार रजनीकांत 31 डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा  - Superstar Rajinikanth will announce his political party on December 31 | Politics Marathi News - Sarkarnama

सुपरस्टार रजनीकांत 31 डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

जानेवारीपासून त्यांचा राजकीय पक्ष कार्यान्वित होणार आहे. येणारी विधानसभा निवडणूक रजनीकांत लढवणार असल्याची चर्चा आहे.  

नवी दिल्ली : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत. रजनीकांत यांनी आज टि्वट करून याबाबत माहिती दिली आहे. जानेवारीपासून त्यांचा राजकीय पक्ष कार्यान्वित होणार आहे. येणारी विधानसभा निवडणूक रजनीकांत लढवणार असल्याची चर्चा आहे.  

काही दिवसापूर्वी रजनीकांत यांचे वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर लावण्यात आले होते. यात त्यांच्या राजकारणाच्या प्रवेशाबाबत त्यांना आग्रह करण्यात आला होता. गेल्या वर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्ती केली जात होती.

पण गेल्या महिन्यात आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत रजनीकांत यांनी दिले होते. रजनीकांत हे दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. डिेसेंबर २०१७ मध्ये त्यांनी तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. २०१७ मध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर रजनीकांत यांनी ही घोषणा केली होती. मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. 
 

हेही वाचा : फिल्मसिटी उभारा...पण मुंबई `स्पिरीट`ही घेऊन जा!
पुणे : योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारायची आहे. योगींसारख्या संन्याशी नेत्याला चित्रपटांचे आणि चित्रपटनगरीचे आकर्षण वाटावे हेच विशेष आहे. भगव्या कपड्यातील मंडळींना कला, चित्रपट यांचा तिटकारा असतो, असा सर्वसाधारण समज आहे. तो योगींपुरता तरी दूर झाला आहे. योगींनी मुंबईत आल्यानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या, निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे योगी हे बॉलीवूड उत्तर प्रदेशात नेणार, अशी चर्चा सुरू झाली.बॉलीवूड नेणे एवढे सोपे आहे ? भारतीय चित्रपटाचा इतिहास जेथे रचला आणि तो समृद्ध सुरू झाला. ती ही मुंबई महानगरी आहे. दादासाहेब फाळकेंसारख्या प्रयोगशील मराठी माणसाने भारतातील पहिला चित्रपट तयार करून मुंबईसाठी आणि देशासाठी नवीन दालन सुरू करून दिले. प्रभातसारख्या मराठी माणसाच्या चित्रपट कंपनीने यात मोलाची भर घातली. प्रभातचे चित्रपट व्यावसायिक आणि कलात्मक आणि तांत्रिक दृष्टीने जगभर गाजले. हा भारतीय चित्रपटसृष्टीचाही वेगळ्या अर्थाने गौरव होता. मुंबईत मराठी माणसांची नाट्यचळवळ आधीपासून जोरात होती. त्यामुळे अतिशय गुणवान कलाकार या चित्रपटसृष्टीला मिळण्याचा मार्ग येथे सुकर झाला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख