सुलतानपूरच्या खासदार मेनका गांधी यांना कोरोनाची लागण

मेनका गांधी या दिल्लीतील आपल्या निवासस्थानीच विलगीकरणात राहणार आहेत.
Sarkarnama Banner.png
Sarkarnama Banner.png

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी Maneka Gandhi यांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. काल त्यांची कोरोना चाचणी केली होती.  मेनका गांधी या दिल्ली येथे होम क्वांरटाइन आहे.  सुलतानपूरच्या Sultanpur खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी  या अनेक दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या मदतकार्यात सामील होत्या. चार दिवसांपूर्वीच त्यांनी सुलतानपूर येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणीची प्रक्रिया सुरू केली होती. Sultanpur MP Maneka Gandhi infected with corona

मेनका गांधी या दिल्लीतील आपल्या निवासस्थानीच विलगीकरणात राहणार आहेत. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोविड चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मेनका गांधी या महिन्यातून किमान दोनदा मतदारसंघाचा नियमित दौरा करतात.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ  पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 19 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 48 हजार 421 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 205 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला होता 


देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 3,48,421

देशात 24 तासात मृत्यू – 4205

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,55,338

एकूण रूग्ण – 2,33,40,938

एकूण मृत्यू – 2,54,197

एकूण डिस्चार्ज – 1,93,82,642

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,04,099

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या -17,52,35,991

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com