शेतकरी आंदोलनामुळे मोदी-शहांची 'कणखर' प्रतिमा मलीन! भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये 'पीएमओ'च्या जवळच्या भाजप सदस्याने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या सोशल मिडियावरील चर्चेबाबत ट्विट करून सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
subramanian swamy slams PM Narendra Modi and Amit Shaha Over Farmers protest
subramanian swamy slams PM Narendra Modi and Amit Shaha Over Farmers protest

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची 'कणखर' प्रतिमा मलीन झाली आहे, असं मोठं विधान भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच 'पीएमओ'च्या जवळच्या भाजप सदस्याने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या सोशल मिडियावरील चर्चेबाबत ट्विट करून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

नवी दिल्लीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला मंगळवारी  हिंसक वळण लागले. अनेक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर जात शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला. तसेच पोलिसांना मारहाण झाल्याचा घटनाही समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. या घटनानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून भाजपभोवतीच संशय निर्माण केला आहे. तसेच मोदी व शहांवरही टीका केली आहे.

मोदी-शहांविषयी केलेल्या ट्विटमध्ये स्वामी म्हणतात, ''पंजाब काँग्रेस, अकाली राजकारण आणि त्यांचे मध्यस्थ तसेच मोदी-शहा यांच्या कणखर प्रतिमेविषयी असलेला आदर शेतकरी आंदोलनामुळे आता संपला आहे. नक्षली, आयएसआय आणि खलिस्तानी यांना फायदा झाला. भाजप, कृपया जागे व्हा.'' तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लाल किल्ल्यावरील हिंसाचारात पंतप्रधान मोदींना ओढले आहे. 

''अशी चर्चा आहे, खोटेही असू शकते किंवा शत्रूच्या बनावट आयडीवरील असेल की, पीएमओच्या जवळील भाजप सदस्याने लाल किल्ल्यावरील हिंसाचाराला चिथावणी दिली. याचा तपास घ्या आणि कळवा,'' असे स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे दोन्ही ट्विटची सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे.

स्वामी यांनी केलेले आणखी एक ट्विट लक्ष वेधून घेत आहे. ''प्रजासत्ताक दिनादिवशी कायदा व सुव्यवस्थेचा फज्जा उडाला. (प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनमध्ये घेण्याचे मी सुचविले होते.) त्यानंतर आता भारताला आणखी अस्थिर करण्यासाठी चीन मार्च-मे या कालावधीत एका मोठ्या हल्ल्याच्या तयारी करेल. हिंदू वेढ्यात. जागे व्हा,'' असे ट्विट करून स्वामी यांनी चीनपासून असलेल्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. 

Edited By Rajanand More 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com