दुर्लक्षीत १४६ क्रांतीकारकांच्या संघर्षाची कहाणी उलगडणार!

क्रांतीकारकांच्या या १४६ जणांच्या यादीत जनसंघाचे नानाजी देशमुख, आणि हिंदू महासभा यांचाही समावेश आहे.
दुर्लक्षीत १४६ क्रांतीकारकांच्या संघर्षाची कहाणी उलगडणार!
1Sarkarnama_20Banner_20_2867_29_1.jpg

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त Independence Day Amrit Mahotsav इतिहासाच्या पानातील दुर्लक्षीत क्रांतीकारकांच्या कार्याच्या सन्मान मोदी सरकार Narendra Modiकरणार आहे. या दुर्लक्षीत क्रांतीकारकांचा जीवनप्रवास समाजासमोर आणण्याचा प्रकल्प यानिमित्ताने सरकार करीत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. या क्रांतीकारकांच्या संघर्षांची कहाणी उलगडणार आहे.  यानिमित्ताने विविध कार्यक्रम आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

केंद्र सरकारने यासाठी अशा १४६ क्रांतीकारकाची यादी तयार केली आहे. स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने ७५ क्षेत्रीय, ६ राष्ट्रीय, २ आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या १४६ नावांची सूची करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली होती. काही इतिहासकारांनी सुभाषचंद्र बोस, बिरसा मुंडा, तात्या टोपे यांच्यावर केलेल्या टीका सुधारण्यासाठी सरकारला सूचविले आहे.  या १४६ जणांच्या यादीत जनसंघाचे नानाजी देशमुख, आणि हिंदू महासभा यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

या समितीचे संचालक ओम जी उपाध्यान म्हणाले की, मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशाच्या स्वांतत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले, अशा दुर्लक्षीत क्रांतीकारकांच्या कार्याचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी त्रिस्तरीय योजना करण्यात आली आहे.   

नाहीतर ईडी लावणार ; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकी 
मुंबई :  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने निनावी फोनचे प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचे Uddhav Thackeray स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांना व्हाँट्सअँपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नार्वेकर या़ंनी ही बाब मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. नगराळे यांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.