कॉलेजचे शैक्षणिक सत्र १ नोव्हेंबरपासून; ‘यूजीसी’ची सूचना

कोरोना लॉकडाउनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण (१०० टक्के) व प्रवेश शुल्क कॅन्सलेशन शुल्क न आकारता परत करावे. त्यानंतर प्रवेश रद्द केलेल्यांच्या शुल्कातूनही १००० रूपयांपेक्षा जास्त रक्कम कापून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Start Classrooms from 1st November UGC Tells States
Start Classrooms from 1st November UGC Tells States

नवी दिल्ली : विद्यापीठांनी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करून शक्‍यतो १ नोव्हेंबरपासून २०२०-२१ चे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केली आहे. रिक्त जागांवरील प्रलंबित प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी, असेही यूजीसीने म्हटले आहे. कोरोना उद्रेक परिस्थिती गंभीर असलेल्या राज्यांनी यात काही बदल हवे असतील तर तसे ‘यूजीसी’ला कळवावे, असे सांगण्यात आले आहे.

‘यूजीसी’च्या कार्यकारिणी बैठकीत याबाबतचे निर्णय घेतल्याचे ‘यूजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी ‘सकाळ’ ला सांगितले. कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परीस्थितीत महाविद्यालये -विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांना विलंब होणार असेल तर १८ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे. ‘यूजीसी’ने नवीन शैक्षणिक वर्षाबाबतचे दिशानिर्देश विद्यापीठांना जारी केले आहेत.

कोरोना लॉकडाउनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले संपूर्ण (१०० टक्के) व प्रवेश शुल्क कॅन्सलेशन शुल्क न आकारता परत करावे. त्यानंतर प्रवेश रद्द केलेल्यांच्या शुल्कातूनही १००० रूपयांपेक्षा जास्त रक्कम कापून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षातील वर्ग ऑनलाईन-ऑफलाईन किंवा दूरस्थ पद्धतीने घेण्याची मुभाही विद्यापीठे-महाविद्यालयांना देण्यात आली आहे.

फेरपरीक्षांचे निकाल १० ऑक्टोबरपर्यंत
केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १२ वी च्या परीक्षेत अगदी थोड्या गुणांनी अनुत्तीर्ण झालेल्या व उत्तीर्ण होण्याची शक्‍यता असलेल्या (कंपार्टमेंट झोन) विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या फेरपरीक्षांचे निकाल १० ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. न्या. अजय खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाला ‘सीबीआएसई’ने आज हा निर्णय कळवला. यामुळे या विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयीन प्रवेशाची संधी मिळणार असली तरी त्यांना महाविद्यालयीन प्रवेश मिळतील याची ‘यूजीसी’ने दक्षता घ्यावी, अशी सूचना न्यायालयाने केली.

असे आहे वेळापत्रक
- ३१ ऑक्‍टोबरपर्यंत : प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत
- १ नोव्हेंबरपासून : पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू
- ५ एप्रिल २०२१ पर्यंत : अभ्यासक्रम पूर्ण करावा
- १ ते ८ ऑगस्ट २०२१ : परीक्षा पूर्वतयारीसाठी सुटी
- ९ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत : अंतिम परीक्षा घ्याव्यात
- ३० ऑगस्ट २०२१ पासून : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com