मुख्यमंत्र्यांच्या दर्शनादरम्यान मंदिरात चेंगराचेंगरी; अनेकजण जखमी  

धक्काबुक्कीमुळे बॅरीगेट पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
 stampede seen Mahakaleshwar Temple in Ujjain, Madhya Pradesh .jpg
stampede seen Mahakaleshwar Temple in Ujjain, Madhya Pradesh .jpg

उज्जेन : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात सोमवारी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे महिला व मुले जखमी झाली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, (Shivraj Singh Chouhan) माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि बऱ्याच अति महत्त्वाच्या व्यक्ती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. (stampede seen Mahakaleshwar Temple in Ujjain, Madhya Pradesh) 

मंदिराच्या गेट नंबर ४ वरून भाविकांनी सुरक्षा घेराव तोडला आणि एकमेकांना ढकलून मंदिरात प्रवेश करण्यास सुरुवात केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असाता त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

गर्दी नियंत्रणा ठेवण्यासाठी आणि दर्शनासाठी जातांना रागेत जावे यासाठी बॅरीकेड लावण्यात आले होते. मात्र, धक्काबुक्कीमुळे बॅरीगेट पडताच मंदिरात जाणाऱ्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. कोरोना संसर्गाच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन या झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यासंदर्भात महाकाळ मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास महाकाल मंदिरातील गेट नंबर चार येथे ही घटना घडली आहे.

ते म्हणाले, भगवान महाकालच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी जमली होती. या ठिकाणी अचानक आलेल्या जमावाने बॅरीकेड फेकले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेत कोणालाही इजा किंवा जखमी झाले नाही, असे सिंग यांनी सांगितले. लवकरच सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचेही ते म्हणाले. 

सोमवारी ५ हजार लोकांना मंदिरात जाण्यास पूर्वीच परवानगी देण्यात आली होती. परंतु श्रावनाच्या पहिला सोमवार असल्यामुळे सुमारे ५० ते ६० हजार भाविक देशभरातून आले होते. उज्जैन येथे महाकालेश्वर मंदिर आहे. भगवान शंकराच्या देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे एक आहे.

Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com