#SSRSuicide : रिया चक्रवर्ती करीत होती सुशांतचा छळ.. ?

सुशांत आणि अभिनेत्री रिया चक्रवती यांचे नातेसंबध चांगले नव्हते. रिया ही सुशांतचा मानसिक छळ करीत असे, असा आरोप अंकिता लोंखडे हिने केला.
Riya Chakraborty.jpg
Riya Chakraborty.jpg

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह रजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी दररोज विविध खुलासे होत आहेत. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोंखडे हिने काल मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाबाबत माहिती दिली. सुशांत आणि अभिनेत्री रिया चक्रवती यांचे नातेसंबध चांगले नव्हते. रिया ही सुशांतचा मानसिक छळ करीत असे, असा आरोप अंकिता लोंखडे हिने केला. अंकिता हिने आपले म्हणणे पुरावेनिशी पोलिसांकडे सादर केले आहे.  याबाबत सुशांतचे व्हाटस्अॅप चॅटिंगचे स्क्रीनशॅाटस् अंकिताने पोलिसांना दाखविले आहेत. एका वृत्तवाहिनेने याबाबतची माहिती दिली आहे. 


सुशांतच्या कुंटुबियांनी गेल्या फेब्रुवारीत याबाबत बांद्रा पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. बिहार पोलिसांनी अंकिताशी संपर्क साधला असता अंकिताने सांगितले की 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रमोशनाच्या दिवशी सुशांतने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठविला होता.

या शुभेच्छा दिल्यानंतर काही दिवस सुशांत आणि अंकिता यांच्यात चित्रपटावरून चर्चा झाली होती. या दरम्यान सुशांत खूप भावूक झाला होता. रिया सोबतच्या रिलेशनशीपबाबत तो खूप तणावाखाली होती. हे रिलेशनशीप तो संपविण्याच्या मार्गावर होता. सुशांतने सांगितले की रिया त्याला खूप त्रास देत होती, असे अंकिताने बिहार पोलिसांना सांगितले. 

काल अंकिताने एक टि्वट केले. यात अंकिताने म्हटले आहे की ''सत्याचाच विजय होईल'' ('Truth Wins') अंकिता लोंखडेंच्या या टि्वटवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या टि्वटच्या पार्श्वभूमीवर आता बिहार पोलिसांनी तपास सुरू केला. सुशांतटी एक बहिण परदेशात राहते. तिच्याशी अंकिताचे चांगले ट्युंनिग आहे.

सुशांतच्या निधनानंतर अंकिता दोन वेळा पाटना येथे त्यांच्या घरी गेली होती. अंकिताने यावेळी सुशांतच्या कुंटुबियाकडे सुशांत आणि तिचे चॅटिंग शेअर केले आहे. यात रिया हि सुशांतचा छळ करीत असल्याचे दिसते. यानंतर रिया चक्रवर्तीकडे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बिहार पोलिस पुन्हा अंकिता लोंखडेला चैाकशीसाठी बोलविण्याची शक्यता आहे. 

सुशांत सिंह रजपूत यांच्या निधनानंतर अंकिता खूपच निराश होती. यातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. काल सुशांतचे वडीलांनी याबाबतची तक्रार पाटना पोलिसांकडे दाखल केली आहे. यानंतर अंकिताने टि्वट केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आग्रहामुळे पाटणा पोलिस सुशांतसिंगच्या कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला तयार झाल्याची माहिती माजी अतिरिक्त साॅलिसिटर जनरल व सुशांतसिंहच्या कुटुंबियांचे वकिल विकास सिंग यांनी दिली.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकताच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जबाब नोंदविला आहे. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनसोबत शेवटी केलेल्या ड्राईव्ह या चित्रपटाच्या कराराची प्रतही मेहता यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी यशराज फिल्म्सचे (वायआरएफ) आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचीही पोलिसांनी नुकतीच चौकशी केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा मॅरेथॉन तपास सुरू आहे. आगामी काळात आणखी काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुशांत याने 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३९ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे.  

Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com