स्पुटनिक व्ही लशीबाबत केंद्र सरकारची महत्वाची घोषणा...कधी मिळणार भारतीयांना लस?

रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांनी मागील महिन्यातच परवानगी दिली आहे.
Sputnik vaccine will be available in the indian market next week
Sputnik vaccine will be available in the indian market next week

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापराला मागील महिन्यातच परवानगी दिली आहे. त्यामुळे या लशीला परवानगी देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. परंतु, या लशीचे किती डोस मिळणार आणि त्यांची किंमत किती याबाबत अद्याप काहीच जाहीर करण्यात आलेले नाही. या लशीची किंमत जागतिक पातळीवर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लशीच्या तुलनेत तब्बल पाचपटीने अधिक आहे. (Sputnik vaccine will be available in the indian market next week)

देशातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. देशात कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता त्यामध्ये स्पुटनिक व्ही या लशीची भर पडणार आहे. ही भारतातील तिसरी लस ठरणार आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाल्यानंतर लशीचे डोस भारतात येण्यास सुरूवात झाली आहे. 

माध्यमांशी बोलताना लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॅा. व्ही. के. पॅाल म्हणाले, मला हे सांगताना आनंद होत आहे की, पुढील आठवड्यामध्ये स्पुटनिक व्ही ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकेल. रशियामधून लशीचा मर्यादीत स्वरूपातील पुरवठा पुढील आठवड्यापासून सुरू होईल. तसेच लशीचे भारतातील उत्पादन जुलै महिन्यात सुरू होईल. जवळपास १५.६ कोटी डोस उत्पादन घेतले जाईल. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, स्पुटनिक व्ही लशीचे सुमारे दीड लाख डोस यापूर्वीच भारतात आले आहेत. तसेच रशियन कंपनी भारतातील काही कंपन्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सहकार्य घेणार आहे. 

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही लशींचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे स्पुटनिक व्ही ही लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com