मोदीची मालमत्ता जप्त का करु नये ?..विशेष न्यायालयाची नोटीस...

नीरव मोदीला विशेष न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
3nirav26.jpg
3nirav26.jpg

मुंबई :  "भारतातील मालमत्ता जप्त का केली जाऊ नये, " असे विचारत पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला विशेष न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  

११ जूनला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स नीरव मोदीला बजावले आहे. तो न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्याच्याविरोधात फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई सुरू होणार आहे.  आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी हे समन्स बजावले आहे. 

डिसेंबर २०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीनंतर विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता नीरव मोदीच्या नावे कारणे दाखवा नोटीस बजावून मालमत्ता जप्तीचे आदेश का देऊ नयेत, असे न्यायालयाने विचारले आहे.

नीरव मोदीची पती अमी, बहीण पूर्वी मेहता आणि बहीणीचा पती मयंक मेहता यांनाही अशाच प्रकारे नोटीस बजावण्यात आली आहे. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चैाकसी यांनी काही बॅकेच्या अधिकाऱ्यांच्यासोबत संगनमत करुन पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी)मध्ये १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला आहे, असे तपास यंत्रणेने म्हटलं आहे. 

मुंबईच्या विशेष न्यायालयाने नीरवची बहीण पूर्वी मेहता हीची पाच महिन्यापूर्वी चैाकशी झाली होती. याप्रकरणी सरकारकडून ती साक्षीदार आहे. फेब्रुवारी २०१८ रोजी मुंबईच्या न्यायालयाने मोदीच्या विरोधात अटक वारंट जारी केले होते. जून २०१८ मध्ये इंटरपोलने मोदीला रेड कॅार्नर नोटीस बजावली होती. ऑगस्ट २०१८मध्ये भारताने ब्रिटनकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मार्च २०१९ मध्ये नीरव मोदीला अटक केली आहे.  नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटीश सरकारकडून परवानगी मिळाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com