सपाचे खासदार आजम खान यांना योगी सरकारचा दणका 

राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
Sarkarnama (88).jpg
Sarkarnama (88).jpg

नवी दिल्ली : नियमभंग केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आजम खान Azam Khan यांना उत्तर प्रदेश सरकारने दणका दिला आहे. उत्तर प्रदेश सरकाने मो. अली जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारण्यात आले आहे. यामुळे राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीचे उल्लंघन करण्यात आले आहे.


सपाचे खासदार आजम खान हे या ट्रस्टचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलपती आहेत. अनियमितता व जमीन अतिक्रमणांच्या आरोपांवरून विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडले. आजम खान व त्यांचे पुत्र अब्दुल्ला सध्या सीतापूर कारागृहात आहेत. 

तत्कालीन समाजवादी पार्टी सरकारने २००५मध्ये  मो. अली जौहर विद्यापीठ अधिनियम बनविले आहेत. यामुळे विद्यापीठ स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज्य सरकारने काही अटींवर विद्यापीठाच्या स्थापनेसाठी १२.५ एकरच्या मयार्देपलीकडे जाऊन ४०० एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याची न्यासाला परवानगी दिली.

या जागेचा उपयोग केवळ शैक्षणिक कामासाठीच केला जावा, ही त्यातील महत्त्वाची अट होती. कायद्यानुसार, अटीचे उल्लंघन केल्यास राज्य सरकारकडून दिलेली जमीन परत घेतली जाईल, असे त्यात म्हटले होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माहिती सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी संपूर्ण घटनाक्रमाचा माध्यम अहवाल पोस्ट करत टि्वट केला आहे की, सरकारची संपत्ती सरकारच्या ताब्यात आहे. हेच मोदी-योगी राज आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in