रजनीकांत पाठोपाठ सौरभ गांगुलीही रुग्णालयात : दोघांवरही होती भाजपची नजर - sourav ganguly suffers heart attack admitted icu cardiac problem | Politics Marathi News - Sarkarnama

रजनीकांत पाठोपाठ सौरभ गांगुलीही रुग्णालयात : दोघांवरही होती भाजपची नजर

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानंतर क्रिकेट प्रेमींसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

कोलकाता : भाजपही जवळीक असलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानंतर क्रिकेट प्रेमींसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

कोलकाता येथील वूडलँड्स हॉस्पीटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे समजते. जीममध्ये व्यायाम करताना त्यांची तब्येत अचानक ढासळली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी रक्तदाबामध्ये चढ-उतार होत असल्याने दाक्षिणात्य सुपर‍स्‍टार रजनीकांत यांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत
 

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी धक्का देणारी आहे. ते आजारातून लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
 
रजनीकांत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. त्यांच्या 'अन्नाथे' या चित्रपटाचं चित्रीकरण रोखण्यात आलं होतं. कारण त्यांच्या टीममधील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईमधील आपल्या फार्महाऊसमध्ये क्वॉरन्टाईन केलं होतं. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अन्नाथे चित्रपटात रजनीकांत यांच्यासह नयनतारा आणि किर्ती सुरेश महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत. सिरुथई सिवा हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख