बिहारला नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा म्हणताच,चिडलेल्या नितीशकुमारांनी मंत्र्यांची केली हकालपट्टी 

बिहारला आता युवा नेतृत्वाची प्रतीक्षा आहे, असे रजक म्हणाले होते.
बिहारला नव्या नेतृत्वाची प्रतीक्षा म्हणताच,चिडलेल्या नितीशकुमारांनी मंत्र्यांची केली हकालपट्टी 

पाटणा :मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हकालपट्टी केलेले उद्योग मंत्री श्‍याम रजक यांची सोमवारी लालू प्रसाद यांच्या राजदमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे राजदने त्यांच्या तीन आमदारांना निलंबित केले. फराज फातमी, महेश्‍वर यादव आणि प्रेम चौधरी अशी त्यांची नावे असून त्यांनी सत्ताधारी जेडीयूच्या पक्षात प्रवेश केला आहे. 

बिहारला आता युवा नेतृत्वाची प्रतीक्षा आहे, असे रजक म्हणाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नितीशकुमारांनी यांनी त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला. मात्र रजक यांनी आरजेडीचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एके काळ रजक हे लालूप्रसाद यांचे घनिष्ट होते.पुढे त्यांनी लालू यांची साथ सोडून नितीश कुमार यांचा हात धरला होता. 

बिहारमधील विधानसभा निवडणूक नोव्हेंबरपूर्वी होणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्या साथीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते रामविलास पासवान यांच्यासह विरोधी पक्ष आग्रही असले तरी नियोजित कार्यक्रमानुसार निवडणूक घेण्याकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कल आहे. सध्या राज्यातील राजकीय आघाडीवर ज्या वेगाने बदल होत आहे, ते पाहून निवडणूक ठरल्या वेळी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

रजक यांनी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या उपस्थित राजदमध्ये प्रवेश केला आहे. तसे ट्‌विट एएनआयने केले आहे. काल नितीशकुमार यांनी रजक यांची हकालपट्टी केली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com