पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम याचे निधन  - singer SP Balasubramaniam passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम याचे निधन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम (वय७४) याचं आज उपचारा दरम्यान निधन झाले.

चेन्नई : प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम (वय७४) याचं आज उपचारा दरम्यान निधन झाले. ता. ५ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती त्यांनी फेसबुकवरून शेअर केली होती.

गेल्या २४ तासात त्यांची प्रकृती अधिक खराब झाली. उपचार सुरू असताना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.  अभिनेता सलमान खानने त्यांच्या प्रकृतीबाबत टि्वट केलं होते. अभिनेता कमल हसन काल एमजीएम रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते.  

एसपी बालासुब्रमण्यम यांचा जन्म नेल्लूर येथे एका तेलगु परिवारात झाला होता. त्यांचे वडील एस.पी.सम्बामूर्ती हे हरिकथा आर्टिस्ट होते. एसपी बालासुब्रमण्यम यांना ६ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गैारविण्यात आलं होते. गायक, संगीतकार, अभिनेता, डबिंग आर्टिस्ट, चित्रपट निर्माता अशी विविध क्षेत्रात ते कार्यरत होते. हिंदी, तेलुगू, मल्याळम , तामिळ अशा १६ भाषांमध्ये त्यांनी सुमारे ४० हजार गाणी गायिली होती. गिनेज वर्ल्ड रेकॅार्डमध्ये सर्वात जास्त गाणी म्हणणारा गायक म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे.  

 पद्म श्री (2001) पद्म भूषण (2011) या पुरस्कारांनी त्यांचा गैारव करण्यात आला आहे.  एस.पी. बालासुब्रमण्यम 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'अंधा कानून', 'साजन', '100 डेज', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'अंगार' यासारख्या चित्रपटातील गाणी त्यांनी गायिली होती.  

एसपी बालासुब्रमण्यम यांची काही गाजलेली गाणी

  1. मेरे रंग में रंगने वाली- मैंने प्यार किया
  2. बहुत प्यार करते है – साजन
  3. आया है राजा – अप्पू राजा
  4. रोजा जानेमन – रोजा
  5. तेरे मेरे बीच में – एक दुजे के लिये
  6. ओ मारिया – सागर
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख