धक्कादायक : माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या  - Shocking: Former Union Minister's wife breaks into house and killed | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

कुमारमंगलम या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होत्या.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ही हत्या करण्यात आली. कुमारमंगलम  या दिल्लीतील वसंत विहार परिसरामध्ये राहत होत्या. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये एका संक्षयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोन जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, किट्टी यांची हत्या का करण्यात आली यासंदर्भातील माहिती अद्याप मिळाली नाही. (Shocking: Former Union Minister's wife breaks into house and killed) 

हेही वाचा : मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतु:सूत्री

किट्टी कुमारमंगलम यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास इस्त्रीवाला घरी आला होता. त्यानंतर दोन अन्य व्यक्ती घरी आल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोन अनोळखी व्यक्तींनी माझे हात पाय बांधले व किट्टी कुमारमंगलम यांची हत्या केली, अशी माहिती त्या महिलेने दिली आहे. पोलिसांनी या इस्त्रीवाल्याला अटक केली आहे. 

तोंडावर उशी दाबून किट्टी यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाजानुसार सांगण्यात येत आहे. हत्येची माहिती पोलिसांना ११ वाजण्याच्या सुमारस देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केली.

हेही वाचा : वाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असेत!

कुमारमंगलम या सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील होत्या. त्यांचे पती पी. आर. कुमारमंगलम पहिल्यांदा १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी संसदीय मंत्री आणि कायदा, सुव्यवस्था कंपनी अफेर्स मंत्रालयाचे काम १९९१ ते ९२ या काळात पाहिले होते. ते १९९२ ते ९३ मध्ये संसदीय कामकाज मंत्री होते. १९९८ मध्ये ते देशाचे ऊर्जामंत्रीही होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख