धक्कादायक : नेत्याच्या घरी सापडले EVM अन् व्हिव्हिपॅट  

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे.
 EVM, VVPAT .jpg
EVM, VVPAT .jpg

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ( West Bengal elections) सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. याचदरम्यान हावडा येथील उलूबेरिया नॅार्थमध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्याच्याघरी ईव्हिएम मशीन आणि व्हिव्हिपॅट सापडल्याची घटना घडली आहे. Shocking: EVM and Vivipat found in leader's house

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. उलूबेरिया उत्तरमधून असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार (BJP) चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसीबेरियाने टीएमसी नेता गौतम घोष यांना लोकांनी ईव्हिएम (EVM) आणि ४ व्हिव्हिपॅटसह (VVPAT) पकडले. त्यानंतर परिसरात तणाव पसरला होता. त्यानंतर केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशिनपैकी वाटत असल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. आणि याचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घटनेनंतर एका अधिकाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे. Shocking: EVM and Vivipat found in leader's house

आसामध्येही घटला होता असा प्रकार 

आसामध्येही असाच प्रकार घडला होता. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या गाडीतून ईव्हिएम मशीन नेण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या घटनेने मतदानासाठी असलेल्या ईव्हिएमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि कायदा सुव्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव टाकला असल्याचे दंडाधिकाऱ्यांनी म्हटले होते.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com