शिवसेना करणार भाजपची कोंडी; उत्तर प्रदेश अन् गोवा निवडणूक लढवणार 

भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 ShivSena will contest Uttar Pradesh and Goa elections .jpg
ShivSena will contest Uttar Pradesh and Goa elections .jpg

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आता पासूनच तापू लागले आहे. यात आता शिवसेनेने (ShivSena) उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. (ShivSena will contest Uttar Pradesh and Goa elections) 

भविष्यात युती होण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत. यासंदर्भात एक पत्रक शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभारी विश्वजीत सिंह यांनी जारी केले आहे. तर शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनीही गोवा आणि उत्तर प्रदेशात जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केली आहे. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपच्या कार्यकाळात निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजपला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

१० सप्टेंबर रोजी लखनऊमधील हरतगंज येथे पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि पक्षाची वाटचाल कशी असणार यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याचेही ते म्हणाले.

पत्रामध्ये म्हटले आहे की, सरकार ब्राह्मणांविरोधात गैरव्यवहार करत आहे. राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी सामान उपलब्ध होत नव्हते. अशी परिस्थिती होती. बंद असणाऱ्या शाळाही राज्यामधील विद्यार्थ्यांकडून हव्या तशा पद्धतीने फी घेत आहेत. सरकार शिक्षणसम्राटांच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यालयांमधील फी १५ टक्क्यांनी कामी केलेली नाही. महाराष्ट्र सरकारने कायदा बनवून विद्यार्थ्यांना १५ टक्के फी सवलत दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारी आणि महागाईमुळे तरुण मुले राज्य सोडून जात आहेत. सरकार शेतकरी आणि तरुणांसोबत सावत्र असल्याप्रमाणे व्यवहार करत असल्याचे आरोप करत भाजपवर निशाणा साधला आहे. 

शिवसेना उत्तर प्रदेशमधील जनतेचा आवाज बनून त्याच्यामध्ये जाणार. शिवसेना सर्व जागांवर उमेदावर उतरवून भाजपला धडा शिकवणार असल्याचे म्हटेल आहे. सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्ष बांधणीसाठी समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. लवकरच उत्तर प्रदेशमधील शिवसेना नेत्यांचे एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन या निवडणुकीसंदर्भात अहवाल सादर करणार असल्याचे म्हटले आहे.   


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com