मुख्यमंत्र्यांचे मतदारांना "हात" साफ करण्याचं आवाहन  - Shivraj Singh chouhan targets Congress | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे मतदारांना "हात" साफ करण्याचं आवाहन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे सॅनिटाइझरने चांगल्या पद्धतीनं "हात" साफ  करा.

नवी दिल्ली : देशात काही ठिकाणी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चैाहान यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. निवडुकीत मतदारांना "हात" साफ करण्याचे आवाहन केलं आहे. याबाबत शिवराज सिंह चैाहान यांनी टि्वट केलं आहे. 

शिवराज सिंह चैाहान आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की माझ्या प्रिय मित्रांनो, देशातील काही भागात मध्यप्रदेश, बिहार आणि कर्नाटक येथे निवडणुका होत आहेत. कोरोनाच्या काळात निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे सॅनिटाइझरने चांगल्या पद्धतीनं "हात" साफ  करा. 

निवडणुक आयोगाने बिहार विधानसभेची निवडणुकीची घोषणा नुकतीच केली आहे. बिहारमध्ये 243 जागासाठी निवडणुका तीन टप्प्यात होत आहेत. तर मध्यप्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ता. 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात 28 जागांवर पोटनिवडणुक होणार आहे. 

निवडणुक आयोगानं बिहार निवडणुकीचं रणशिंग नुकतेच फुंकले आहे. सध्या बिहारमधील राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व 243 जागा लढविण्याचे ठरविले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला आघाडीत जर सन्मानजनक जागा मिळणार असतील , तर ते त्यांच्यासोबत निवडणुक लढविणार असल्याची माहिती काँग्रेस कार्यकारणीनी समितीचे प्रमुख अविनाश पांडेय यांनी दिली आहे. 

पांडेय म्हणाले की राष्ट्रीय जनता दलासोबत आमची सन्मानपुरक युती झाली तर आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढविणार आहोत. बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते अविनाथ पांडेय, सदस्य काजी निजामुद्दीन आणि देवेंद्र यादव हे पटना येथे पोहचले आहे

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिकयुद्ध सुरू झाले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी निवडणुकीची तारीख जाहीर होताच टि्वट करत प्रसाराचं रणशिंग फुंकले आहे.  बिहारमधील मतदारांना जनतेचं राज्य आणण्यासाठी आव्हान केलं आहे. याबाबत लालू प्रसाद  यादव यांनी टि्वट केलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख