ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्तेचा गैरवापर; सुवेंदू अधिकारी यांचा आरोप - She is queen of rigging: Suvendu on Mamata alleging BJP may rig EVMs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

ममता बॅनर्जी यांच्याकडून सत्तेचा गैरवापर; सुवेंदू अधिकारी यांचा आरोप

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

भाजपकडून ईव्हीएम घोटाळा केला जाऊ शकतो, हे विधान हास्यास्पद आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लोकशाही पद्धतीने होणार असून भाजपचा विजय तर तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल. त्यामुळेच ममता अस्वस्थ झाल्या असून वाट्टेल ते विधान करत असल्याची टीका सुवेंदू अधिकारी यांनी केली.

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकीच्या तारखा जशाजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशातशा राजकारण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोलिस, प्रशासन यांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी केला. घुसखोर व पाकिस्तानी लोकांना ममता मदत करत आल्याचेही ते पुढे म्हणाले. 

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून ईव्हीएममध्ये फेरफार करून घोटाळा केला जाऊ शकतो,असे विधान ममता बॅनर्जी यांनी नुकतेच केले होते. याच पार्श्वभूमीवर सुवेंदू यांनी हे सारे आरोप धुडकावून लावले. सुवेंदू पुढे म्हणाले, ममता बॅनर्जी धांदल उडवून देणाऱ्या राणी आहेत. भाजपकडून ईव्हीएम घोटाळा केला जाऊ शकतो, हे विधान हास्यास्पद आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लोकशाही पद्धतीने होणार असून भाजपचा विजय तर तृणमूल काँग्रेसचा पराभव होईल. त्यामुळेच ममता अस्वस्थ झाल्या असून वाट्टेल ते विधान करत असल्याची टीकाही सुवेंदू यांनी केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना सुवेंदू म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी ममता यांनी भाजपला केंद्रातून हटविण्याचा नारा देत भाजपचा सुपडा पश्चिम बंगालमध्ये साफ करू असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र तृणमूलच्याच सीट्स त्यावेळी निम्म्याने कमी झाल्या. यंदाच्या वेळी त्यामध्ये आणखी घट होत भाजपचाच विजय होईल, असा विश्वासही सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला. दरम्यान, २७ मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होणार आहे.      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख