लखनऊ : प्रियकराच्या मदतीने घरातील सात जणांची हत्या करणाऱ्या शबनमला फाशीची शिक्षा झाली आहे. आता फाशी न देण्याची मागणी करणारी दया याचिका तिने राज्यपालांकडे केली आहे. यापूर्वीच राष्ट्रपतींनी तिची फाशीची दया याचिका नामंजूर केली आहे. तिने पुन्हा एकदा दया याचिका केली असून राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यावर निर्णय घेणार आहेत.
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा न्यायालयाने शबनमला २०१० मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयानेही शबनमची शिक्षा कायम ठेवली. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. पण याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर राष्ट्रपतींनीही ११ अॉगस्ट २०१६ रोजी दया याचिका नामंजूर केली.
शिवसेना नेत्याने केले प्रतिपादन#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/hNB61XmMNa
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 19, 2021
स्वतंत्र भारताच्या इतिहासात एका महिला आरोपीला पहिल्यांदाच फाशी दिली जाणार आहे. घरातील सात जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या शबनम नावाच्या महिलेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिला फाशी देण्याची तयारी मथुरा कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. अद्याप फाशीचा दिवस ठरला नसला तरी त्यादृष्टीने सर्व जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यातच शबनमने वकिलांमार्फत कारागृह प्रशासनाकडे दया याचिका केली आहे. प्रशासनाकडून ही याचिका राज्यपालांकडे पाठविली जाईल. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यावर निर्णय घेतील.
हेही वाचा : काँग्रेसचे सरकार २२ तारखेला पडणार; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा...
काय आहे प्रकरण?
शबनम ही अमरोहा येथील आहे. तिचे व एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. त्याला घरच्यांकडून विरोध होता. या रागातून तिने प्रियकराच्या मदतीने २००८ मध्ये घरातील सात जणांची कुऱ्हाडीने निघृण हत्या केली. त्यामध्ये तिचे वडील, आई, दोन भाऊ, वहिनी आणि तिच्या बहिणाचा समावेश होता. त्यानंतर तिने १० महिन्यांच्या बाळाचीही हत्या केली. सलीम असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. यावेळी ती गर्भवती होती. तुरूंगात असताना तिला मुलगा झाला.
मथुरेत दिली जाणार फाशी
महिलांना फाशी देण्याची व्यवस्था केवळ मथुरा येथील कारागृहात आहे. स्वातंत्र्यापूर्वीच इथेच महिलांना फासावर लटकवले जात होते. पण स्वातंत्र्यानंतर अद्याप एकाही महिला आरोपीला फाशी दिली गेली नाही. त्यामुळे शबनम ही स्वातंत्र्यानंतर फासावर जाणारी देशातील पहिली महिला आरोपी ठरणार आहे. तिथे फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शबनमचा प्रियकर सलीमलाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या शबनम बरेली कारागृहात तर सलीम आग्रा येथील कारागृहात आहे.
शबनमकडे दोन पदव्या...
शबनमने इंग्रजी व भुगोल विषयात एमएची पदवी मिळविली आहे. हत्या करण्यापूर्वी ती गावातील प्राथमिक शाळेत शिकवत होती. तर सलीमने सहावीतूनच शाळा सोडून दिली आहे. तो शबनमच्या घराजवळ असलेल्या एका लाकडाच्या वखारीत काम करत होता. हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पाच दिवसांतच अटक केली होती.
Edited By Rajanand More

