सेक्स स्कँडलच्या आॅडिओ क्लिपमुळे 71 वर्षीय नेत्याचा गेम

झिम्बाब्वेचे 71 वर्षीय उपाध्यक्ष केंबो मोहादी हे एका सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत.
Sex scandal involving Zimbabwe Vice President Kembo Mohadi
Sex scandal involving Zimbabwe Vice President Kembo Mohadi

हरारे : झिम्बाब्वेचे 71 वर्षीय उपाध्यक्ष केंबो मोहादी हे एका सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयातील महिलांसह अन्य काही महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा झिमलाईव्ह या स्थानिक न्यूज पोर्टलने केला आहे. त्यांनी मोहादी यांच्या मोबाईलमधील अॉडिअो क्लिप सार्वजनिक केल्या असून या क्लिपमध्ये ते काही महिलांना सेक्सची मागणी करत असल्याचे झिमलाईव्हने म्हटले आहे. 

केंबो मोहादी यांच्या महिलांशी झालेल्या संवादाच्या अॉडिओ क्लिप बाहेर आल्यानंतर झिम्बाब्वेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या सेक्स स्कँडलवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मोहादी यांनी मात्र आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. क्लिपमध्ये आपला आवाज नसल्याचे मोहादी यांचे म्हणणे आहे. आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, समोर आलेल्या एका अॉडिओ क्लिपमध्ये एक पुरूष आपल्या कार्यालयामध्ये सेक्स करण्याबाबत बोलत असल्याचे समोर आले आहे. एका अॉडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्याच कार्यालयातील विवाहित महिला अधिकाऱ्याशी बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मोहादी हे 2019 मध्येही वादात सापडले होते. संपत्तीच्या वादातून त्यांनी त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करण्याची धमकी दिली होती. ते माजी सैनिक असून त्यांनी देशाच्या मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला होता. मोहादी यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले आहे.

आरोप फेटाळताना मोहादी म्हणाले, ''मी निर्दोष आहे. राजकीय षडयंत्रामध्ये मला अडकविले जात आहे. माझा आवाज क्लोन करण्यात आला आहे. माझे आरोप केवळ चुकीचेच नाहीत तर माझी राष्ट्रीय नेता ही प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले पूर्वनियोजित षडयंत्र आहे. माझ्या भविष्याचा निर्णय अध्यक्षच घेतील.''

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com