भाजपला गळती; दोन दिवसांत दोन आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे.
SetBack to BJP MLA Biswajit Das join TMC in Kolkatta
SetBack to BJP MLA Biswajit Das join TMC in Kolkatta

कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन दिवसांत दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी तन्मय घोष यांनी तर मंगळवारी विश्वजित दास यांनी पक्षाला रामराम ठोकत घरवापसी केली आहे. दोघांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. (SetBack to BJP MLA Biswajit Das join TMC in Kolkatta)

दास यांनी तृणमूलमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी ते बोनगाव (उत्तर) मतदारसंघाचे आमदार होते. अडीच महिन्यांपूर्वीच भाजपमधून तृणमूलमध्ये दाखल झालेले मुकूल रॉय यांच्यापाठोपाठ त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रॉय यांनी घरवापसी केली. त्याचवेळी दास यांनीही परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच भाजपमध्ये विधानसभा मतदारसंघावरून त्यांची नाराजी होती. अखेर मंगळवारी त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

निवडणुकीनंतर भाजपचे तीन आमदार तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत. तर दोघांनी आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. हे दोघे खासदार आहेत. त्यामुळं भाजपच्या आमदारांची संख्या 77 वरून 72 पर्यंत खाली आली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय (Mukul Roy) यांची अडीच महिन्यांपूर्वी घरवापसी झाली आहे. त्यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांनी घरवापसी करत भाजपला झटका दिला आहे.. हे सत्र अजूनही सुरूच असल्याने भाजपला सातत्याने धक्के बसत आहेत. 

बंगालमध्ये तृणमूलने मोठा विजय मिळवत भाजपला धक्का दिला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटचे अनेक नेते फोडत भाजपने सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी केली होती. पण निवडणुकीत पराभव झाला अन् भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झाली. मुकुल रॉय हे त्यापैकी एक मोठं नाव आहे. पण त्याआधीपासूनच अनेक माजी आमदार, नेत्यांनी ममता यांची पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपमध्ये गेलेल्या मवाळ नेत्यांसाठी तृणमूलचे दरवाजे नेहमीच खुले राहतील असं तृणमूलच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आमदारांचीही घरवापसी होत आहे. सोमवारी विष्णुपुरचे भाजपचे आमदार तन्मय घोष यांनी घरवापसी केली. निवडणुकीआधी ते भाजपमध्ये दाखल झाले होते. रविवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सौमेन मित्रा यांची पत्नी शिखा मित्रा आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची नातेवाईक शुभ्रा घोष या तृणमूलमध्ये दाखल झाल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com