मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू असल्याची ज्येष्ठ मंत्र्याची कबुली - Senior minister Ishwarappa admits that Yeddyurappa removal campaign is underway in BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुख्यमंत्री हटाव मोहीम सुरू असल्याची ज्येष्ठ मंत्र्याची कबुली

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

हायकमांडच याबाबत अंतिम निर्णय घेतील.

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना हटवण्यासाठी भारतीय जनता पक्षांतर्गत हालचाली सुरू असल्याची कबुली मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी बुधवारी (ता. १६ जून) दिली. येडियुराप्पा हटाव मोहिम सुरू असली तरी हायकमांडच याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. (Senior minister Ishwarappa admits that Yeddyurappa removal campaign is underway in BJP)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंग यांच्या बंगळूर दौऱ्यापूर्वीच ईश्वरप्पा यांचे हे विधान पुढे आले आहे. अरुणसिंग हे कर्नाटक भाजपचे प्रभारी आहेत. आपल्या तीन दिवसांच्या भेटीत ते मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची अपेक्षा आहे.

ईश्वरप्पा म्हणाले, काहींनी मुख्यमंत्री बदलले जावेत, असा प्रस्ताव मांडला होता. काही जणांना येडियुराप्पाच मुख्यमंत्रिपदी राहावेत, असे वाटते. काही जण त्यासाठी दिल्लीला गेले होते. पक्षात समस्या आहेत. मी पक्षात कोणत्याच समस्या नाहीत, असे म्हटले तर मी खोटे बोलल्यासारखे होईल. अरुणसिंग पक्षातील समस्या सोडवण्यासाठी येत आहेत. आमदार, मंत्री आणि पदाधिकारी सिंग यांची भेट घेतील व त्यांना ज्या समस्या असतील, त्या व्यक्त करतील, असे ईश्वरप्पा म्हणाले. 

हेही वाचा : ‘छत्रपती’ हा माजी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम मुलांचे पुनर्वसन केंद्र आहे का?

सिंग यांच्या भेटीनंतर नेतृत्वात बदल होईल का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘मला माहीत नाही. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो अंतिम असेल. समस्या सोडवणे हा भाजपचा एक गुण आहे. कारण समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्व पाऊल टाकत आहे. भाजप हा एक असा पक्ष आहे जिथे समस्या सोडविण्यास कोणीतरी आहे. काँग्रेसकडे पाहा.

दरम्यान, येडियुराप्पा पुढील दोन वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘सिंग मंत्र्यांशी चर्चा करतील. ज्यांना सिंग यांना भेटायचे आहे, ते त्यांना भेटू शकतात. आमदार त्यांच्याशी स्वतंत्रपणे बोलू शकतात, असे ते म्हणाले.’’ ता.१८ जून रोजी सिंग हे प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत भाग घेतील.

विरोधकांना शह देण्याची येडियुरा​प्पांची तयारी 

पक्ष प्रभारी अरुणसिंग यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपले निकटवर्तीय मंत्री, आमदारांशी बुधवारी (ता. १६ जून) चर्चा केली. काही येडियुरप्पा विरोधक नेतृत्व बदलासाठी निवेदन व येडियुरप्पांविरुध्द तक्रार देण्याची तयारी करीत आहेत. त्याला शह देण्यासाठी येडियुरप्पा यांनीही तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, गृहमंत्री बसवराज बोम्मई, मंत्री सी. सी, पाटील, प्रभू चव्हाण यांच्यासह काही मंत्री व आमदार बैठकीला उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख