भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन - Senior BJP leader, former Union Minister Jaswant Singh passes away | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह (वय 82) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते.

नवी दिल्ली :  भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह (वय 82) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निधनाची माहिती टि्वटव्दारे दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत टि्वट केलं आहे. जसवंत सिंह यांनी भाजपला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारण आणि समाजकारण यांच्याबाबत त्यांचा दृष्टीकोन वेगळा होता. त्यांनी अगोदर एक सैनिक नंतर राजकारण अशी दुहेरी सेवा देशाची केली आहे.

संबंधित लेख