प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून… पंतप्रधान  - Seeing the insult to the tricolor flag on Republic Day… Prime Minister | Politics Marathi News - Sarkarnama

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून… पंतप्रधान 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 31 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला.

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी, ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केलं. दिल्लीत २६ जानेवारी रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला. असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं केल होत. 

आपण कोरोना काळामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात संयम आणि धैर्य दाखवले. यावर्षीही आपल्याला कठोर परिश्रम करून आपला संकल्प सिद्ध केला पाहिजे. या महिन्यात क्रिकेटमधूनही खूप चांगली बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघाने सुरुवातीच्या अडचणीनंतर चांगला खेळ करत पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली. आमच्या खेळाडूंची मेहनत आणि टीम वर्क प्रेरणादायक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख