राम मंदिर जमीन घोटाळा? काही मिनिटांत दोन कोटींवरून 18.5 कोटींची झाली जमीन

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
Scam in land purchased by ram mandir trust allegation by SP and AAP
Scam in land purchased by ram mandir trust allegation by SP and AAP

अयोध्या : राम मंदिरासाठी (Ram Temple) जमीन खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राम जन्मभूमी ट्रस्टवर करण्यात आला आहे. ट्रस्टच्या सचिवांनी काही मिनिटांपुर्वी दोन कोटी रुपयांत विकण्यात आलेली जमीन 18.5 कोटींमध्ये खरेदी करत घोटाळा केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने अयोध्येत (Ayodhya) तर आम आदमी पक्षाने लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे. (Scam in land purchased by ram mandir trust allegation by SP and AAP)

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांची आम्ही चिंता करत आहे. आमच्यावर महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप करण्यात आला होता, असे ते म्हणाले. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे.

पांडे म्हणाले, राम जन्मभूमीच्या जमिनीलगत असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सुल्तान अंसारी आणि रवि मोहन यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर काही मिनिटांतच चंपत राय यांनी ट्रस्ट मार्फत हीच जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीत असे काय होते की, दहा मिनिटांतच त्याला सोन्याचा भाव आला, असे आरोप पांडे यांनी केले आहेत. 

पांडे यांच्या आरोपांनंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लखनऊ मध्ये पत्रकार परिषदेत हे आरोप केले. पाच मिनिटांमध्ये या जमिनीचे भाव 16.5 कोटींनी वाढले. हा जागतिक विक्रम आहे. रविमोहन तिवारी आणि सुल्तान अंसारी यांच्याकडून 18.5 कोटी रुपयांना खरेदी केलेल्या जमीने भाव प्रति सेकंदाला साडे पाच लाखांनी वाढले. जगात कुठेच एका सेकंदात जमिनीचे भाव एवढे वाढले नाहीत, असे संजय सिंह म्हणाले. या जमीन व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सिंह यांनी केली आहे. 

या आरोपांवर बोलताना ट्रस्टचे सचिव चंपत राय म्हणाले, आम्ही आरोपांची चिंता करत नाही. आमच्यावर असे आरोप सतत केले जातात. आम्ही 100 वर्षांपासून आरोपच पाहतोय. आमच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचे आरोपही करण्यात आले. आरोपांची चिंता आम्ही करत नाही, तुम्हीही करू नका. तुम्ही तुमचे काम करा, आम्हाला आमचं काम करू, असे राय यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com