शशिकलांची कोंडी : तमिळनाडू सरकारकडून कोट्यवधीची मालमत्ता जप्त...

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत.
Sasikalas Properties Worth Crores Seized Three Days after Her Return to Tamil Nadu
Sasikalas Properties Worth Crores Seized Three Days after Her Return to Tamil Nadu

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या विविध यंत्रणांनी शशिकला व त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यास सुरूवात केली आहे. शशिकला यांना चोहोबाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

शशिकला यांचे चेन्नईतील घरात पाऊल पडण्याआधीच राज्यातील अण्णाद्रमुक सरकारने त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यास सुरवात केली. शशिकलांची भावजय जे.इलावरसी आणि जयललितांचा दत्तकपुत्र व्ही.एन.सुधाकरन यांच्या चेन्नईतील दोन मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सुधाकरन हाही शशिकला यांचा नातेवाईक आहे.

कांचीपुरम, तंजावूर, तिरूवरूर आणि चेंगालपेट जिल्ह्यातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. कांचीपुरममधील 300 कोटी किंमतीची 144 एकर जमीन, तंजावुरमधील 26 हजार चौरस फुटाची मालमत्ता, आणि तिरूवरूरमधील 1050 एकर मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे. ही जमीन शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांची मालकी असलेल्या कंपनीची आहे. या मालमत्ता कंपनीने 1994 आणि 1996 मध्ये घेतल्या होत्या.

दरम्यान, या मालमत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण राज्य शासनाने शशिकला यांच्या आगमनानंतर लगेच मालमत्तांवर जप्ती सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री ईके पलानीस्वामी यांनीही याच्याशी राजकारणाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. सरकार केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

तमिळनाडूतील राजकारण तापले

शशिकलांच्या आगमनाने राज्यातील राज्यातील राजकारण तापले आहे. दक्षिणेतील सुडाचे राजकारण या निमित्ताने पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त आहे. शशिकलांचे घरात पाऊल पडण्याआधीच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यास सत्ताधारी अण्णाद्रमुकने सुरवात केली आहे. त्यांच्या अशा पद्धतीने सरकारने स्वागत केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात इलावरसी आणि सुधाकरन यांनाही शशिकलांसोबत शिक्षा झाली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तिघांनाही दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावूनत्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला होता. आता इलावरसी आणि सुधाकरन यांची वॉलेस गार्डनमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून सरकार सुडबुध्दीने ही कारवाई करत असल्याची टीका शशिकला यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com