मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पॅाझिटिव्ह.. - Sachin Tendulkar tested positive for corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पॅाझिटिव्ह..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

सचिनच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सचिन सध्या होम क्वारन्टाईन झाला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली.  सचिनच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. सचिन सध्या होम क्वारन्टाईन झाला आहे.

"मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या," असं सचिन तेंडुलकरने टि्वटमध्ये म्हटलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी सचिनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यात काल 26 मार्चला दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. 

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर आले आहे. काल दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे.

पुणे जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच लाखांच्या घरात

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी (ता.२६) पाच लाखांच्या घरात पोचली. गेल्या वर्षभरापासून काल अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ४ लाख ९९ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण नोंदले गेले आहेत.  एकूण कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत ४ लाख ३७ हजार १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकाच दिवसांत जिल्ह्यात ७ हजार ९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३ हजार ५९४ जण आहेत.यामुळे जिल्ह्यातील सक्रिय (अँक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या आता ५३ हजार आठ झाली आहे. जिल्ह्यात आज ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील २४ जणांचा समावेश आहे. पुण्यातील सर्वाधिकरुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ८२५, जिल्हा परिषदकार्यक्षेत्रात १ हजार १२५, नगरपालिका क्षेत्रात ४४० आणि कॅंटोन्मेंट
बोर्ड क्षेत्रात १०६ रुग्ण सापडले आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख