सचिन पायलट यांनी मानले प्रियांका गांधींचे आभार

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांना बंडखोर नेते सचिन पायलट यांची समजूत काढण्यात यश आले. पायलट-गांधी भेटीनंतर कॉंग्रेसकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये पायलट यांनी पक्ष आणि राजस्थानात कॉंग्रेस सरकारच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Sachin Pilot thanked Priyanka Gandhi :
Sachin Pilot thanked Priyanka Gandhi :

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांना बंडखोर नेते सचिन पायलट यांची समजूत काढण्यात यश आले. पायलट-गांधी भेटीनंतर कॉंग्रेसकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये पायलट यांनी पक्ष आणि राजस्थानात कॉंग्रेस सरकारच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हा राजकीय संघर्ष सोडविण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार समिती स्थापन केली जाणार असून ही समिती या समस्येवर तोडगा काढेल, असे यात नमूद करण्यात आले आहे. 

मागील काही दिवसांपासून बंडखोर नेते सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील संघर्षामुळे राजस्थानात रंगलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर पायलट आमचेच असून ते आमच्यासाठीच काम करतील असे पक्षाकडून सांगण्यात आले. 

कॉंग्रेस पक्षाकडून सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आल्यानंतर पायलट यांनी रात्री समर्थक आमदारांनासोबत घेऊन थेट राहुल गांधी यांचे कार्यालय गाठले. या वेळी सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा, अहमद पटेल आदी नेते उपस्थित होते. तत्पूर्वी पायलट यांनी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. ते प्रियांका यांना दोनदा भेटल्याचे समजते. 

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढल्याचे समजते. यामुळे नजीकच्या काळात पक्षात संघटनात्मक पातळीवर आणि राज्य सरकारमध्येही बदल होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षामुळे राजस्थानातील सरकार अस्थिर झाले असून विश्वासदर्शक ठरावाच्या माध्यमातून सत्ता स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या गटाचे आमदार यांना चुचकारण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू आहेत 

पायलट गटाला आश्वासन 

पायलट गटाला सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे सांगितले जाते. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याआधी राजकीय हालचालींना गती येऊ शकते. दरम्यान गेहलोत गटाने पायलट यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असताना सचिन पायलट यांना समजावण्यासाठी प्रियांका गांधींनी पुढाकार घेतला होता. 

समिती करणार तक्रार निवारण 

पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडून झालेली कोंडी पक्ष नेतृत्वाच्या कानी घातली. यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची तक्रार निवारण समिती बनविण्याचा मुद्दाही पुढे आल्याचे कळते. याभेटीआधी सचिन पायलट यांची कॉंग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. 

हा संघर्ष पदासाठी नव्हताच. ही मान-सन्मानाची लढाई होती. पक्षाने सांगितले तर आपण नवे पददेखील स्वीकारू शकतो. पक्षाने आमच्या समस्यांची दखल घेत समितीच्या स्थापनेची घोषणा केल्याबद्दल मी पक्षाच्या अध्यक्षांचे आभार मानतो. पक्षाच्या हितासाठी आवाज उठविणे गरजेचे होते. आमचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल प्रियांका-गांधी वद्रा यांचा मी आभारी आहे. 

-सचिन पायलट, बंडखोर नेते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com