पायलट यांचे विमान गेहलोतांच्या घरी लॅंड 

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी हायकमांडशी चर्चा केल्यानंतर आपली बंडखोरीची तलवार मान्य करत आपण कॉंग्रेस पक्षातच आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर ते स्वगृही म्हणजे राजस्थानात परतले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलेल्या बैठकीला हजेरी लावत पायलट यांनी आपण मागील सर्व विसरून पक्षासाठी काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Sachin Pilot meets Rajasthan Chief Minister Ashok Gehlot
Sachin Pilot meets Rajasthan Chief Minister Ashok Gehlot

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी हायकमांडशी चर्चा केल्यानंतर आपली बंडखोरीची तलवार मान्य करत आपण कॉंग्रेस पक्षातच आहोत, असे जाहीर केले होते. त्यानंतर ते स्वगृही म्हणजे राजस्थानात परतले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी बोलविण्यात आलेल्या बैठकीला हजेरी लावत पायलट यांनी आपण मागील सर्व विसरून पक्षासाठी काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात गेली महिनाभर रंगलेला सत्तासंषर्घ अखेर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या पुढाकारातून मिटला. या दोघांशी चर्चा करत पायलट यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखविली होती. गांधी बहिण भावाकडून पायलट यांची समजूत काढत त्यांना कॉंग्रेसमध्ये परत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पायलट यांनीही पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. 

गेली महिनाभर हरयानातील हॉटेलमध्ये असणारे पायलट आपल्या समर्थकांसह दोन दिवसांपूर्वीच राजस्थानात परत आले होते. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आज (ता. 13 ऑगस्ट) आपल्या निवासस्थानी कॉंग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली होती. गेली महिनाभर चालेले आरोप-प्रत्यारोप विसरत आणि मुख्यमंत्र्याबरोबरील वाद संपुष्टात आणत पायलट हे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी पोचले. 

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस सचिन पायलट यांनी उपस्थिती लावत वरिष्ठ नेते आणि अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. कॉंग्रेस पक्षात परतल्यानंतर सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातील ही पहिलीच बैठक होती. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत छायचित्रकारांसाठी पोझही दिली. सचिन पायलट हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या शेजारी बसले आहेत. या वेळी कॉंग्रेस पक्षाचे खासदार के. सी. वेणुगोपालही उपस्थित होते. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्गामुळे या दोन्ही नेत्यांनी तोंडावर मास्क लावले होते. 

दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे आमदार जयपूरमधील हॉटेलमधून बसने थेट मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले. राजस्थानमध्ये उद्यापासून (ता. 14 ऑगस्ट) विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

राजस्थान विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून (ता. 14) सुरू होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे भारतीय जनता पक्षाने आधीच जाहीर केले आहे. विधिमंडळ पक्षाच्या गुरुवारी (ता. 13 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत भाजपने हा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसकडे बहुमत नाही, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com