रशियन लशीच्या भारतात चाचण्या होणार  - Russian vaccines will be tested in India | Politics Marathi News - Sarkarnama

रशियन लशीच्या भारतात चाचण्या होणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

या आधी भारताने या लशीला मान्यता दिली होती पण नंतर मात्र नियामकांनी तिच्या पुरेशा चाचण्या झाल्या नसल्याचे सांगत त्यांना ब्रेक लावला होता.

पॅरिस कोरोनावरील रशियन बनावटीच्या ‘स्फुटनिक-५’ या लशीच्या भारतातील शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांना हिरवा कंदील मिळाला आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) आणि डॉ. रेड्डीज लॅब या दोन संस्थांना आता या लशीच्या क्लिनिकल ट्रायल घेता येतील. 

या आधी भारताने या लशीला मान्यता दिली होती पण नंतर मात्र नियामकांनी तिच्या पुरेशा चाचण्या झाल्या नसल्याचे सांगत त्यांना ब्रेक लावला होता. तसेच या लशीच्या निर्मात्यांना आणखी चाचण्या घेण्याचे निर्देश दिले होते. आता या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार असून त्यामध्ये दीड हजारजण सहभागी होतील. 

शिक्षकाची हत्या करणारा चेचेन हल्लेखोर ठार 
पॅरिस इतिहासाचा विषय शिकवणाऱ्या शिक्षकाची गळा चिरुन हत्या करणाऱ्या १८ वर्षीय चेचेन हल्लेखोराला पोलिसांनी ठार केल्याची घटना शुक्रवारी रात्री पॅरिसच्या उपनगरात घडली. मृत शिक्षकाने काही दिवसांपूर्वी शिकवताना प्रेशितांविषयी चित्र दाखवल्यामुळे हल्लेखोर नाराज होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यात हल्लेखोराचे आजोबा, पालक आणि हल्लेखोरच्या १७ वर्षीय भावाचा समावेश आहे. 

पॅरिस परिसरातील कॉन्फ्लांस सेंट होनोरिन येथील एका माध्यमिक शाळेत काही दिवसांपूर्वी त्या शिक्षकाने प्रेशिताविषयी चित्र दाखवले होते. त्यामुळे संशयित चेचेन युवकाने काल सायंकाळी शिक्षकाचा पाठलाग सुरू केला. संधी साधून हल्लेखोराने चाकूने शिक्षकाचा गळा चिरला. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला. त्यांनी सशस्त्र मारेकऱ्यास शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्याने नकार दिल्यामुळे पोलिसांनी त्याला ठार केले.

 हल्लेखोरांबाबत फ्रान्सने किंवा दहशतवाद विरोधी खात्याने अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु काही माध्यमांच्या मते, हल्लेखोर हा १८ वर्षाचा असून तो चेचेनचा आहे. त्याचा जन्म मॉस्कोमध्ये झाला. यादरम्यान, फ्रान्सच्या शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात पोलिस आणि तपास यंत्रणांना काम करु द्यावे, असा सल्ला माध्यमांना दिला आहे. वेळप्रसंगी सर्व माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख