सरकार अल्पमतात तरी मुख्यमंत्री म्हणतात, आमच्याकडे बहुमत...

चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचेसरकार अल्पमतात आले आहे.
Ruling Congress dispensation ahead of the assembly polls due in few months
Ruling Congress dispensation ahead of the assembly polls due in few months

नवी दिल्ली : चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे पुदुच्चरीमधील सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला असून राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांकडून काँग्रेसला घेरण्यात आले आहे.

काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. काँग्रेसकडे आता ११ आमदार उरले आहेत. तर विरोधी पक्षांकडे १४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. काँग्रेसकडे बहुमत नसल्याने सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी मात्र सरकारकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. आपण सभागृहात बहुमत सिध्द करू असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी पाच वर्षांत पहिल्यांदाच पुद्दुचरीमध्ये बुधवारी येत आहेत. त्यांच्या येण्याआधीच चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याआधीच पक्षावर ही नामुष्की ओढवली आहे. 

पुद्दुचरीमध्ये एकुण २९ आमदार असून काँग्रेस आघाडीचे १५ आमदार होते. तर विरोधी पक्षांकडे १४ आमदार आहेत. चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसकडे ११ आमदार राहिले आहेत. आमदार ए. नमासिव्यम आणि ई थीपप्पंजन यांनी २५ जानेवारीलाच राजीनामा दिला आहे. तर एका आमदाराने सोमवारी आणि एका आमदाराने मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पुढील काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असल्याने चार आमदारांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याची पक्षाकडून जोरदार तयार सुरू आहे. पण या दौऱ्यावर आता सरकारच्या अल्पमताचे सावट राहणार असल्याने मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com