दोन मुलांची आई असल्याचं सांगत खासदाराच्या पत्नीची ईडीला हुलकावणी

ईडीने कोळशाच्या बेकायदेशीर उत्खनन आणि चोरीच्या प्रकरणात मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Rujira Banerjee expresses inability to appear before ED
Rujira Banerjee expresses inability to appear before ED

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीची पिडा लागली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यावरही ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे. कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं त्यांच्यासह पत्नी रुजिरा यांनाही दिल्लीच्या कार्यालयात येण्याची नोटीस पाठवली होती. यापूर्वीही या प्रकरणात त्यांची चौकशी झाली आहे. (Rujira Banerjee expresses inability to appear before ED)

रुजिरा यांना बुधवारी तर अभिषेक बॅनर्जी यांना 6 सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. यावेळी मात्र ईडीच्या चौकशीला सामोरं जाण्याचं रुजिरा यांनी टाळलं आहे. त्यासाठी त्यांनी कोरोना व दोन लहान मुलांची आई असल्याचं कारण पुढं केलं आहे. तसं पत्र त्यांनी ईडीला पाठवलं आहे. मी दोन लहान मुलांची आई आहे. सध्या कोरोना संकट काळामध्ये प्रवास करणं मुलांसाठी धोक्याचं आहे. त्यामुळे दिल्लीला येणं शक्य होणार नाही. मी कोलकाता येथे असल्यानं तिथे चौकशीला बोलवावं, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

ईडीने कोळशाच्या बेकायदेशीर उत्खनन आणि चोरीच्या प्रकरणात मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच गुन्ह्याची सध्या जोरदार चौकशी सुरू आहे. यामध्ये नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयने याच प्रकरणात रुजिरा यांची 23 फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्येच त्यांची चौकशी झाली होती. 

रुजिरा यांची बहीण आणि परिवारातील काही सदस्यांचाही या प्रकरणात जबाब घेण्यात आला आहे. त्यामुळं त्यांच्या कुटूंबावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे असल्यानं भाजपकडून त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जाते. विधानसभा निवडणुकीतही त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. 

अभिषेक बॅनर्जी यांनी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. भाजपकडून सुडभावनेनं ही कारवाई केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. इतर काही प्रकरणांमध्येही सरकारमधील मंत्र्यांची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून केली जात आहे. निकालानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणीही सरकारच्या अडचणी वाढत चालल्याची चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com