RSS भारतातील तालिबानी, त्यांना थांबवायला हवं  

RSS भारतातील तालिबानी असून ते दाढी वाढलेल्या, बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात
Sarkarnama (56).jpg
Sarkarnama (56).jpg

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर  rss टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानसोबत केली असल्याने वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने rjdटि्वट करुन आपल्या नेत्याच्या विधानाने समर्थन केलं आहे. यावर भाजपचे नेते संतप्त झाले असून त्यांनीही या नेत्यावर पलटवार केला आहे. 

''अफगाणिस्तानमध्ये afghanistan सध्या तालिबान जे काम करीत आहेत, ते काम भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे, अशी टीका बिहार राजदचे प्रदेशाध्यक्ष जगनानंद सिंह Jaganand Singh यांनी केलं आहे. ते म्हणाले की RSS भारतातील तालिबानी असून ते दाढी वाढलेल्या, बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करतात,'' असे जगनानंद सिंह म्हणाले. 

भाजप वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याइतका मोठा नाही! 
''तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे. जी अफगाणिस्थानमध्ये आहे. आरएसएस हे भारतातील तालिबानी आहेत. त्यांना थांबवायला पाहिजे. त्यांच्याविरोधात पुढे येणं गरजेचे आहे,'' असे जगनानंद सिंह यांनी म्हटलं आहे. यापूर्वी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर निशाणा साधला होता. जगनानंद सिंह यांच्याबरोबरच लालू प्रसाद यादव यांनीही काल RSS वर टीका केली होती. 
 
संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय नेते राष्ट्रपतींना भेटणार
नवी दिल्ली  : खासदार संभाजी छत्रपती MP Sambhaji Raje यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणासाठी आज महाराष्ट्रातील सर्वपक्षीय‌ नेते एकत्रितपणे राजधानी दिल्लीत बाजू मांडणार आहेत. या प्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांचे एक शिष्टमंडळ दुपारी चार वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.  मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com