माझ्याविरोधात अधिकाऱ्यांचे राजकारण्यांशी संगनमत; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महिला 'आयएएस'चा आरोप

राज्याच्यामुख्य सचिवांनीदोघींची तडकाफडकी बदली करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Rohini Sinduru says collusion of officers with politicians to target me
Rohini Sinduru says collusion of officers with politicians to target me

म्हैसूर : म्हैसूनमधून बदली करण्यात आलेल्या दोन महिला आयएएस (IAS) अधिकाऱ्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. या वादात आता राजकारणाची 'एंट्री' झाली आहे. एका महिला अधिकाऱ्याने थेट राजकारण्यांना लक्ष्य केलं आहे. मला टार्गेट करण्यासाठी अधिकारी आणि काही राजकारण्यांनी संगनमत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हा आरोप केल्याने चर्चांना ऊत आला आहे. (Rohini Sinduru says collusion of officers with politicians to target me)

म्हैसूर (Mysore) महापालिकेच्या आयुक्त शिल्पा नाग (Shilpa Nag) आणि जिल्हाधिकारी रोहिणी सिंदुरी (Rohini Sindhuri) अशी या महिला आयएएसची नावे आहेत. सिंदुरी या छळ करत असल्याचा आरोप करत नाग यांनी चार दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावेळी दोघींमधील वाद चव्हाट्यावर आला. त्यानंतर सिंदुरी यांनीही याबाबत खुलासा करत नाग यांचे आरोप फेटाळून लावले होते. 

राज्याचे मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी तडकाफडकी दोघींची बदली करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सिंदुरी यांची बदली बेंगलुरू येथे हिंदु रिलिजियस अॅन्ड चॅरिटेबल संस्थेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नाग यांना ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे (ई-गव्हर्नन्स) संचालक करण्यात आले आहे. पण त्यानंतरही हा वाद मिटलेला नाही. सिंदुरी यांनी रविवारी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेत बदली रद्द करण्याची मागणी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिल्याचे समजते. 

त्यानंतर सोमवारी सिंदुरी यांनी म्हैसूर येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नाग यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उपायुक्तांना लक्ष्य करण्यासाठी काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझी बदली या मिशनऐवजी महामाराशी लढणे हे मिशन असायला हवे होते. अधिकाऱ्याच्या बदली मिशन अपूर्ण राहील, असे म्हणणे चुकीचे आहे. पण अशा घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील यंत्रणा राबविणे कठीण जाते. अधिकाऱ्यांना मुक्तपणे काम करू द्यायला हवे. काही जणांचा विनाकारण हस्तक्षेप असू नये, असेही त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

राजीनाम्या दिल्याची घोषणा नाग यांनी आज पत्रकार परिषदेत केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, आज मी राजीनामा देत आहे. माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे योग्य वातावरण नाही. कुणीही माझ्यासारखे अशा परिस्थितीतून जाऊ नये. जिल्हा उपायुक्त रोहिणी सिंदुरी यांनी माझा अपमान केला आहे. मी माझा राजीनामा मुख्य सचिवांकडे पाठवला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सिंदुरी या लक्ष्य करीत आहेत. महापालिकेने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. परंतु, याचे श्रेय जिल्हा प्रशासन घेत आहे. 

रोहिणी सिंदुरी यांनी त्यांच्या बचावासाठी मांडलेले पाच मुद्दे मांडले होते. मी शिल्पा नाग यांचा कोणताही छळ केलेला नाही आणि त्यांनी अशा एकाही घटनेचा उल्लेखही केलेला नाही. कोरोना संकटाच्या काळात माझ्यावर कोरोना महामारीच्या हाताळणीची जबाबदारी आहे. कोरोनाचे नियंत्रण करण्यावर माझा पूर्णपणे भर असून, माझ्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याला माझे प्राधान्य आहे. शिल्पा नाग या मागील काही काळापासून कोरोना आढावा बैठकांना उपस्थित राहत नाहीत. म्हैसूर शहर महापालिका कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्या याबद्दल विरोधाभासी माहिती देत आहेत. यात सुधारणा करण्याचे आदेश मी दिले होते. कल्पनाविलास केला तरी यातील एकही बाब छळ होत नाही. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com