#Rippedjeans : प्रियांका गांधीचा 'त्या' फोटोंवरून मोहन भागवत, गडकरींवर निशाणा

फाटलेली जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार करणार? असे आक्षेपार्ह वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी केले आहे.
Ripped Jeans Priyanka Gandhi criticise PM Narendra modi, Mohan bhagwat and nitin gadkari
Ripped Jeans Priyanka Gandhi criticise PM Narendra modi, Mohan bhagwat and nitin gadkari

नवी दिल्ली : फाटलेली जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार करणार? असे आक्षेपार्ह वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी केले आहे. त्यावरून वाद निर्माण झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो महिलांनी या वक्तव्याचा समाचार घेत फाटलेल्या जीन्समधील फोटो शेअर केले आहेत. 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या वादा उडी घेतली आहे. रावत यांच्या वक्तव्यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या तिघांचे हाफ पॅन्टमधील जुने फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 'हे भगवान, त्यांचे गुडघे दिसत आहेत', असे त्या फोटोंच्या वर लिहिण्यात आले आहे. प्रियांका गांधींच्या या ट्विटला ५५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर १५ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी हे ट्विट शेअर केले आहे. 

काँग्रेसनेही रावत यांच्या वक्तव्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. रावत यांच्यासह पंतप्रधान मोदी, मोहन भागवत आदींची महिलांविषयीची काही जुन्या वक्तव्यांच्या आधारे एक व्हिडिओ तयार करून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये भाजपची महिलांविषयीची अशी मानसिकता आधीपासूनच असल्याची टीका करण्यात आली आहे. 

सोशल मिडियावर लाखो नेटकऱ्यांनी रावत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. विशेषत: सर्वच क्षेत्रातील महिलांनी आपले फाटलेल्या जीन्सवरील फोटो शेअर केले आहेत. सोशल मिडियावर #RippedJeans व #RippedjeansTwitter हे ट्रेंड प्रचंड व्हायरल झाले असून तीव्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

राज्यसभेच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्य शोबत नाही. कपड्यांवरून तुम्ही संस्कार ठरवणार. ही विकृत मानसिकता असून महिलांवर अत्याचारासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल, अशी टीका त्यांनी केली. त्यांची नात नव्या नवेली नंदा हिनेही यावर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कपडे बदलण्यापूर्वी आधी तुमची मानसिकता बदला, असे नव्या म्हणाली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी रावत यांच्यावर टीका करताना विचार बदला तरच देश बदलेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. देशाची संस्कृती आणि संस्कारांवर अशा लोकांमुळे विपरीत परिणाम होतो, असे त्या म्हणाल्या. 

काय म्हणाले होते रावत?

रावत यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर ते लगेच वादात सापडले आहेत. डेहराडून येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी महिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. एक प्रसंग सांगत त्यांनी महिलांविषयी टिप्पणी केली. अनेक महिला फाटलेली जीन्स वापरतात. पण अशा जीन्समुळे समाजात योग्य संदेश जाईल का? याचे मुलांच्या मनावर काय संस्कार होतील? चांगले संस्कार करण्याची जबाबदारी पालकांवर असते. एखाद्या स्वयंसेवी संस्थेत काम करणारी महिलाच असे कपडे परिधान करत असेल तर समाजावर होणारे संस्कार कसे असतील?, असे वक्तव्य रावत यांनी केले होते. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com