काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात, "रिया निरागस.., तिची सुटका करा.." - Rhea is innocent get rid of her Adhir Chowdhury | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात, "रिया निरागस.., तिची सुटका करा.."

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

रिया निरागस आहे, तिची सुटका करा,"  अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर चैाधरी यांनी केली आहे.

नवी दिल्ली : "अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही राजकारणाचा बळी ठरली आहे, तिला जास्त त्रास देऊ नका, रिया निरागस आहे, तिची सुटका करा,"  अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर चैाधरी यांनी केली आहे. आपल्या टि्वटरवरून चैाधरी यांनी रियाच्या सुटकेची मागणी केली आहे.  

अभिनेता सुशांत राजपूतने आत्महत्याच केली आहे, असा अहवाल एम्सनं दिल्यानंतर चौधरी यांनी रियाच्या सुटकेची मागणी केली आहे. आपल्या टि्वटमध्ये अधिर चैाधरी म्हणतात की अभिनेता सुशांतसिंहच्या निधनामुळे आपण सगळेच दुःखी आहोत. रिया निर्दोष असल्याचं मी यापूर्वी म्हटलं होतं. एम्सने दिलेल्या अहवालानंतर आता भाजपचे कार्यक्रते, प्रचार यंत्रणा एम्सच्या फॉरेन्सिक टीमवर पण आरोप करू शकते.  

संबंधित लेख