भाजप कार्यालयातच 'रेमडेसिविर'चे फुकटात वाटप; नागरिकांची लांबच लांब रांग - Remdesivir injection distributed in surat bjp office for corna patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

भाजप कार्यालयातच 'रेमडेसिविर'चे फुकटात वाटप; नागरिकांची लांबच लांब रांग

वृत्तसंस्था
रविवार, 11 एप्रिल 2021

पाच हजार इंजेक्शन मोफत वितरित करण्यात येणार असल्याचा दावा भाजपनं केला आहे.

सूरत : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एक इंजेक्शन मिळविण्यासाठी नागिरकांना जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. अनेकांना वेळेत इंजेक्शन मिळत नाही. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. यावरून भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. पण भाजपचीच सत्ता असलेल्या गुजरातमध्ये भाजप कार्यालयात रेमडेसिविरचे फुकटात वाटप सुरू केल्याचे समोर आले आहे. 

गुजरामध्येही कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढला चालला आहे. त्यामुळे रेमडेसिविरची मागणीही वाढली आहे. अशातच भाजपच्या सूरतमधील कार्यालयातून रेमडेसिविर मोफत देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे पाच हजार इंजेक्शनचे वाटप केले जाणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. कार्यालयात इंजेक्शनच्या बॅाक्स, नागरिकांच्या कार्यालयाबाहेरील रांगेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनीच इंजेक्शनच्या वाटपाबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. सूरतमधील भाजप कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. इंजेक्शनसाठी डॅाक्टरांची चिठ्ठी आणि कोरोना रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

अनेक मित्रांनी ही इंजेक्शन खरेदी केली आहेत. बाजारभावाप्रमाणे त्याची खरेदी करून भाजपकडून वितरीत केली जात आहेत. आम्ही पाच हजार इंजेक्शनचे वितरण करण्याचे ठरविले आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. हे इंजेक्शन प्रत्येकाला मोफत दिले जात आहे. प्रत्येकी एक याप्रमाणे वाटप सुरू आहे. भाजप कार्यालयात 5 हजार इंजेक्शन पोहचले आहेत. 

मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी यावर थेट भाष्य करणे टाळले आहे. पत्रकारांशी बोलताना रुपाणी म्हणाले, ''हे नियोजन केलेल्या पाटील यांनाच याबाबत विचारा. सरकारचा याच्याशी काही संबंध नाही." दरम्यान इंजेक्शन घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर नागरिकांची रांग लागली आहे. त्यामध्ये पोलिसांपासून सगळे जण रांगेत उभे राहत आहेत. मात्र, यावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख