भाजपच्या खासदार म्हणतात, "हनुमान चालीसा वाचा.. कोराना संपवा"  

"हनुमान चालीसा वाचा आणि कोरानाला संपवा" असे प्रज्ञा सिंह ठाकुर यांचे मत आहे. याबाबत त्यांनी एक टि्वट केले आहे.
2singh_1.jpg
2singh_1.jpg

नवी दिल्ली : भोपाळ येथील  भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी कोरानावर रामबाण उपाय शोधला आहे. "हनुमान चालीसा वाचा आणि कोरानाला संपवा" असे प्रज्ञा सिंह ठाकुर यांचे मत आहे. याबाबत त्यांनी एक टि्वट  केले आहे. या टि्वटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे. 

देशभरातूनन कोरोनाला संपविण्यासाठी ता. ५ आॅगस्ट पर्यंत दररोज सांयकाळी सात वाजता आपल्या घरात हनुमान चालीसाचे पाच वेळा वाचन करावे, असे प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी सांगितले आहे. हनुमान चालीसा वाचल्यामुळे देशातून कोरानाचे संकट जाईल, असा विश्वास प्रज्ञा सिंह ठाकुर यांना आहे.

कोरोनाला संपविण्यासाठी या एक आध्यमिक उपाय असल्याचे त्याचे मत आहे. टि्वटर त्यांनी याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्या पुढे म्हणतात,  "येत्या पाच तारखेपर्यंत दररोज रामाची आरती करा. घरात दिवे लावा." पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येला पाच तारखेला राम मंदिराच्या भूमीपूजनाला जाणार आहे. या कार्यक्रमाला खासदार  प्रज्ञा सिंह ठाकुर या देखील जाणार असल्याचे समजते.

देशभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या ४८ तासात देशात कोरोनाबाधितांची संख्या ४८ हजार ६६१ इतकी झाली आहे.  देशात गेल्या २४ तासांत ८०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ इतकी झाली असून यात ४.६७ लाख रूग्ण गंभीर आहेत. आतापर्यंत देशात ३२ हजार ९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ८.८५ लाख जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण आहेत. गेल्या २४ तासात सुमारे एक हजार नवीन रूग्ण आढळले आहेत.  २४ तासात २६० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५७ हजार झाली आहे. एकुण मृतांची संख्या १३ हजार १३२ वर पोहचली आहे. देशात यानंतर दुसरा क्रमांक तामीळनाडू राज्याचा लागतो. येथे एकाच दिवशी ६ हजार ७८५ रूग्ण आढळले आहेत.  तर कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. 
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा : कोवीड सेंटरमधील पाच डॉक्टर पॉझिटिव्ह...   
 
जळगाव : जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. शहरातही त्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आज जळगावात दाखल झाली आहे. शहरात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार करणारे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच डॉक्टर व तीन लॅब असिस्टंट पॉझीटीव्ह आल्याने उपचारासाठी आता डॉक्टरांची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. केंद्रीय समितीकडे डॉक्टरांची मागणी करण्यात आली आहे. या कोविड केंद्रांतील उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनाही कोविडची लागण आहे. त्यामुळे उपचाराची समस्या निर्माण झाली आहे. 
  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com