Raphael plane will land at Ambala airport this afternoon   | Sarkarnama

राफेल विमाने आज दुपारी अंबाला हवाई तळावर उतरणार... 

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जुलै 2020

फ्रान्समधून उड्डान झालेली पाच राफेल विमाने आज दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान भारताच्या अंबाला (हरियाणा) हवाई तळावर दाखल होत आहेत.

नवी दिल्ली : फ्रान्समधून उड्डान झालेली पाच राफेल विमाने आज दुपारी 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान भारताच्या अंबाला (हरियाणा) हवाई तळावर दाखल होत आहेत. यासाठी अंबाला येथे हवाईदलाची तयारी पूर्ण झाली आहे. ही विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून अंबाला येथे येत आहेत. हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया हे या विमानांचे स्वागत करणार आहेत. 
 
भारताच्या हवाई दलाने चार वर्षापूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटींची करार करून 36 राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील 5 राफेल विमाने येत आहेत. या पार्श्वभूमीवर अंबाला परिसरात हवाईदलाने कडेको़ड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना फोटो, सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या विमानांचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंह हे करीत आहेत. सर्व पायलट हे कोरोनाच्या नियमाचे पालन करीत आहेत. या पाच विमानातील तीन विमाने ही एक सीटची आहेत कर दोन विमाने ही दोन सीटची आहेत. 
 
आज येणाऱ्या या ऱाफेल विमानाबाबत भारतीय हवाईदलाने टि्वट केले आहे. या टि्वटमध्ये म्हटले आहे की राफेलच्या माध्यमातून फ्रान्सने भारताला दिलेली मदतीसाठी आम्ही आभारी आहोत. आतापर्यंत १२ लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले आहे. आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

आएएफच्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात राफेल दाखल झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांची ताकद वाढेल.

सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल.

२ जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात दहा ऐवजी ५ विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार ही विमाने उद्या भारतात पोहोचत आहेत. भारतीय लष्करात अंबाला हे हवाईदलाला खूप महत्व आहे. या ठिकाणी ब्रह्मोस मिसाइल आहेत. 'मिग 21' ही लढाऊ विमाने अंबालाच्या तळावर तैनात आहेत. अंबाला अंतिसंवेदनशील हवाईदल आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख