धक्कादायक : खासदारा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

एफआयआरमध्ये एलजेपीचे नेते चिराग पासवान यांचेही नावे आहे.
धक्कादायक : खासदारा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 
Prince Raj Paswan .jpg

नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र बलात्कारांच्या घटनांनी हादरला आहे. त्यातच आता दिल्लीमध्ये एका खासदाराच्या विरोधातच बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. एका महिलेने तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बिहारमधील समस्तीपूर येथील एलजेपीचे खासदार प्रिन्स राज पासवान (Prince Raj Paswan) यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये एलजेपीचे नेते चिराग पासवान यांचेही नावे आहे. चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी त्यांचे चुलत भाऊ प्रिन्सविरोधातील करवाईला उशीर केला. (Rape case filed against MP Prince Raj Paswan)  

पीडितेने दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, बेशुद्ध अवस्थेत प्रिन्स राज यांनी तिचा विनयभंग केला होता. तर प्रिन्स राज पासवान यांनी देखील या प्रकरणात तक्रार दाखल केला आहे. त्यामध्ये प्रिन्स राज म्हणाले आहेत की, त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहे आहेत. त्यांनी अवेक वेळा या आरोपांचे खंड केले आहे. जेव्हा चिराग पासवान आणि त्याचे काका पशुपती पारस पासवान यांच्यात वाद सुरु होता, तेव्हा घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतही चिराग पासवान यांनी त्या प्रकरणाचा उल्लेख केला होता.  

दरम्यान, मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे निर्भयेवर बलात्कार झाला होता. त्या पीडित महिलेची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. उपचारा दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे. यात पोलिस ठाण्यांना महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या आहेत.

आदेशात म्हटले आहे की, नुकतीच साकीनाका पोलिस ठाणे हददीत रात्रीच्या वेळी एकटया महिलेवर अत्याचाराची घटना घडलेली आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता उपायोजना करण्यात याव्यात.  


  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in