मायावतींवर अश्लील विनोद करणं रणदीप हुड्डाच्या अंगाशी आलं..UNने राजदूत पदावरुन हटविलं

रणदीपचा हा व्हिडिओ सीएमएस सचिवालयाला वादग्रस्त वाटल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
Sarkarnama Banner (3).png
Sarkarnama Banner (3).png

मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा सध्या एका जुन्या व्हिडिओमुळे वादात सापडला आहे. त्याच्या अटकेची मागणी सोशल मीडियामधून जोर धरु लागली आहे. तर त्यांच्या फॅनसाठी एक वाईट बातमी आहे. randeep hooda removed as un treaty ambassador after old video of actor viral over mayawati

'बजरंगी भाईजान' सलमान खान यांच्या 'राधे' चित्रपटात खलनायकांची भूमिका करणारा रणदीप हुड्डा त्यांच्या एका विधानामुळे अडचणीत सापडला आहे. बहुजन समाज पक्षाच्या  सर्वेसर्वा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विनोदाबाबत रणदीप हुड्डा याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर  #arrestRandeepHooda ट्रेंड सुरु आहे. 

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने UN त्याला राजदूत पदावरुन हटविले आहे. संयुक्त राष्ट्राच्या वन्य जीव संरक्षण संबधी मोहिमेसाठी (सीएमएस) रणदीप हुड्डा हा  राजदूत ambassador होता. मायावती प्रकरणामुळे त्याला हे पद गमवावे लागले आहे. २०२० मध्ये त्याची या पदासाठी तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. रणदीपचा हा व्हिडिओ सीएमएस सचिवालयाला वादग्रस्त वाटल्याने त्यांनी हा  निर्णय घेतला आहे.  

या व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डाने मायावती यांच्याबाबत अश्लील विनोद सांगितला आहे. यात त्याने मायावतींची थट्टा केली आहे.  रणदीप हुड्डा हा आक्षेपार्ह शब्द वापरुन मायावती यांची थट्टा करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.  सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रणदीप हुड्डा यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.  अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.
 
उत्तरप्रदेशात मायावती यांचे समर्थक त्यांना 'आयर्न लेडी' म्हणतात. उत्तरप्रदेशात त्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांच्या चाहत्यांचीही संख्या मोठी आहे. रणदीपच्या या विनोदामुळे मायावतींच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे कॉमेडियन अबीश मॅथ्यूने माफी मागितली होती. त्या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावती यांच्याबाबत अपमानास्पद गोष्टी लिहिल्या होत्या.

''रणदीप हुडा हा जोक नाही. आजपर्यंत कोणत्याही पुरुष नेत्यावर थट्टा होत नाही आणि तुम्ही एका दलित आणि मागासांच्या महिला नेत्याची अशी अश्लील थट्टा केली आहे. जे चुकीचे आहे. तर आणखी एका युझरने लिहिले आहे की, तुमच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत, मग तुम्ही आयर्न लेडी मायावती यांचीच थट्टा का केली?''   

रणदीप हुडा या व्हिडीओमध्ये सोशल मीडियाबद्दल बोलत आहे. यावेळी मी तुम्हा एक ‘डर्टी जोक’ सांगतो. तो म्हणतो की, दोन मुलांसह मायावती जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, ही जुळी मुले आहेत का?’ त्यावर मायावती म्हणतात नाही, एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा. यानंतर रणदीप हुडा जे काही म्हणाला त्याबाबत अनेकांची संताप व्यक्त केला आहे.   
  
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com