रामविलास पासवान अतिदक्षता विभागात दाखल ; चिराग पासवान यांचे भावनिक पत्र  - Ramvilas Paswan admitted to intensive care unit Emotional letter from Chirag Paswan | Politics Marathi News - Sarkarnama

रामविलास पासवान अतिदक्षता विभागात दाखल ; चिराग पासवान यांचे भावनिक पत्र 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  बिहार विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकारण ढवळून निघत आहे. केंद्रीय मंत्री व लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत त्यांचे चिरंजीव आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान आपल्या पक्षातील नेत्यांना पत्र लिहिलं आहे. याबाबतची माहिती कळविली आहे. 

पक्षांतील नेत्यांना लिहिलेल्या पत्रात चिराग यांनी आपल्या व्यक्त केल्या आहेत. वडिलांवर उपचार सुरू असल्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना दिल्लीत सोडून मला बिहारला येणे शक्य नसल्याचं त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे. 

चिराग आपल्या पत्रात लिहितात की कोरोनाच्या काळात जनतेला धान्य मिळण्यास त्रास होऊ नये, म्हणून वडिलांनी नियमित करण्यात येणारी आरोग्य तपासणी पुढे ढकलली होती. यामुळे ते आजारी पडले. त्यांच्यावर तीन आठवड्यापासून नवी दिल्लीत उपचार सुरू आहे. त्यांनी मला अनेक वेळा बिहारला जाण्यास सांगितलं. त्यांना रूग्णालयात पाहून मी खूप अस्वस्थ होतो. ते आयसीयूमध्ये असताना मुलगा म्हणून त्यांना सोडून जाणे अशक्य आहे. आज त्यांना माझी गरज आहे. मी त्यांच्यासोबत राहत आहे. अन्यथा तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. 

त्यांनी आपले जीवन ‘बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट’साठी समर्पित केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडीतील मित्रपक्षांशी अद्यापपर्यंत बिहारच्या भवितव्याबाबत, जागावाटपाबाबत चर्चा केलीली नाही, असे चिराग यांनी पत्रात म्हटलं आहे. रामविलास पासवान राज्यसभा खासदार आहेत. केंद्रात ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्री विभागाची धुरा सांभाळणत आहेत. आतापर्यंत तब्बल आठ वेळा त्यांनी लोकसभेवर खासदारकी भूषवली आहे.

हेही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला.. ? 
 
पुणे : राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकाला राज्यसभेत काल मंजुरी मिळवून देण्यात अखेर केंद्रातील भाजप, आरएसएसच्या नरेंद्र मोदी सरकारला यश आले. शेतकऱ्यांचे सुगीचे-दिवाळीचे दिवस संपले आहे. आता त्यांना हमीभाव मिळणार नाही. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने पाठिंबा का दिला ? याचा जाहीर खुलासा त्यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयक सभागृहात मांडली. यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी तिन्ही विधेयकांना विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील खासदारांनी राज्यसभेच्या वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळही घातला. शेवटी मोदी सरकारला आवाजी मतदानाद्वारे तीनपैकी दोन विधेयके मंजूर करवून घेण्यात यश आले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख