'माझं नाव घेतलं तर तुमचा चड्ढा उतरवेन' राखी सावंतचा आपच्या नेत्याला इशारा

ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते.
Sarkarnama - 2021-09-19T123115.800.jpg
Sarkarnama - 2021-09-19T123115.800.jpg

पुणे : पंजाबचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर सध्या चर्चा सुरु असताना ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) हीने या वादात तिचे नाव घेतल्यामुळे आम आदमी पक्षाचे नेते  (AAP) राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. राखी सावंतने चड्ढा यांना समाजमाध्यमातून इशारा दिला आहे. राखीने एका ट्वीटचा स्क्रिनशॉर्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.  राघव चड्ढा यांनी राखीवर केलेल्या विधानाचा तिनं समाचार घेतला आहे. 

कॉग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू हे पंजाबी राजकारणाचे राखी सावंत असल्याचे वक्तव्य राघव चड्ढा यांनी नुकतेच केले. याविषयी कळल्यानंतर संतप्त राखीने राघव यांना इशारा दिला आहे. ''चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल,'' असा इशारा राखी सावंतने दिला आहे.

चंद्रकांतदादा म्हणाले, ''मला कोण राज्यपाल करतंय''  
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी एक मोठे वक्तव्य केले होते. त्यावर आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाना साधत त्यांना पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटले.

याबाबत राखी सावंतला जेव्हा हे कळाले तेव्हा तिनं राघव यांना इशारा देत सांगितले की, राघव चड्ढा, माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. मिस्टर चड्ढा, तुम्ही स्वत: बघा, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझे नाव हवे होते. जर तुम्ही माझ्या नावाचा वापर केलात तर मी तुमचा चड्ढा उतरवेन.

CM Punjab : राहुल गांधींना अंबिका सोनी म्हणाल्या, ''मुख्यमंत्रीपद नको रे बाबा''
चंदिगड : पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठीची लढाई सुरु आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. पंजाब काँग्रेसने काल  सांयकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली. काँग्रेसने राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची (CM Punjab) सूत्रे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाकडे सोपवली, तर कोणाच्या चेहऱ्यावर नावे शिक्कामोर्तब होईल,  यात नवज्योतसिंग सिद्धूंसह 5 नेते आहेत, ज्यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्ये समाविष्ट आहेत.  

Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com