राज्यसभेत कोरोना योध्यांच्या रक्षणाचे विधेयक मंजूर 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणाऱ्या महामारी (दुरूस्ती) 2020 या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे.
3coronavirus1_22.jpg
3coronavirus1_22.jpg

नवी दिल्ली : कोरोना महामारीत आपला जीव धोक्‍यात घालून गेले सहा महिने अहोरात्र रूग्णसेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणाऱ्या महामारी (दुरूस्ती) 2020 या विधेयकाला राज्यसभेने मंजुरी दिली आहे. 

या कायद्याचा परीघ पोलिस व आशा कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवावा, त्याचप्रमाणे कोरोना योध्यांवर हल्ले करणाऱ्यांविरूध्द जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वक्‍त्यांनी केली. मात्र, मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योध्यांची नेमकी संख्या किती, या प्रश्‍नाला सरकारकडून उत्तर मिळाले नाही.

 
कोरोना काळात एप्रिलमध्ये सरकारने हा अध्यादेश आणला होता. या चर्चेत डॉक्‍टरांवर हल्ले करणाऱ्यांविरूध्द कठोर शिक्षेची तरतूद असल्याने कोरोना योध्यांचे मनोबल वाढणार असले तरी केवळ महामारी काळातच नव्हे तर अन्य वेळेतही सरकारी व खासगी डॉक्‍टरांवरही हल्ले करणारांवर कारवाईची तरतूद या विधेयकात करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. 

आशा कर्मचाऱ्यांनाही या कायद्याच्या परिघात आणावे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा देताना कोरोना योध्यांचे वेतन वाढविण्याची सूचना केली. खासगी रूग्णालयांच्या कोरोना काळात लूटमारीला पायबंद घालावा, अशी मागणी बसपाचे वीरसिंह व इतरांनी केली. कोरोना काळातही राज्य सरकारांच्या पाडापाडीचे उद्योग करणाऱ्या पक्षांवर त्यांच्याकडील हा जास्तीचा पैसा पंतप्रधान केअर निधीत जमा करण्याची सक्ती करण्याची उपरोधीक मागणीही प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपचे नाव न घेता केली. 

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की डॉक्‍टरांना वेतन देण्यासाठी राज्यांना केंद्राने यापूर्वीच निधी दिला आहे. राज्यांना पीपीई कीट व अन्य उपकरणे दिली असून अनेक राज्यांनी आपल्याकडे हे साहित्य ठेवण्यास जागा नसल्याचे कळविले आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर भारत वैद्यकीय योजनाही अंमलात येणार आहे. 

अमेरिकेलाही टाकले मागे 

कोरोना महामारीतून बरे होणाऱ्यांबाबत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले असून देशात आतापावेतो 42 लाख 84 हजार 31 लोकांनी कोरोनाविरूध्दची लढाई जिंकली आहे. अमेरिकेत बरे होणारांची संख्या 41 लाख 91 हजार 894 आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ट्‌विट करून ही माहिती दिली. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही (रिकव्हरी रेट) 79.28 पर्यंत वाढले असून मृत्यूदर घटून 1.61 टक्‍क्‍यांवर आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com