राजनाथ सिंह म्हणतात, सीमा असो रुग्णालये लष्कर कायम तयार ! 

देशातील कोरोना संसर्गाचे संकट आणि देशाच्या सीमेवर चीनसारख्या शेजारी देशाबरोबर सध्या सुरू असलेली तणावाची परिस्थिती यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (ता. 5 जुलै) एक मोठे विधान केले. राजनाथ सिंह म्हणाले की, देशातील रुग्णालये असो अथवा सीमा लष्कर कायम तयार असते.
Rajnath Singh says, no matter the border, hospitals, army are always ready
Rajnath Singh says, no matter the border, hospitals, army are always ready

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाचे संकट आणि देशाच्या सीमेवर चीनसारख्या शेजारी देशाबरोबर सध्या सुरू असलेली तणावाची परिस्थिती यादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (ता. 5 जुलै) एक मोठे विधान केले. राजनाथ सिंह म्हणाले की, देशातील रुग्णालये असो अथवा सीमा लष्कर कायम तयार असते. 

दिल्लीत उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कोविड रुग्णालयाच्या भेटीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ यांनी हे वक्‍तव्य केले आहे. राजनाथ सिंह यांच्याबरोबर या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते. 

दिल्लीतील या कोविड-19 रुग्णालयात उपचारासाठी 1000 खाटा आणि 250 आयसीयूची सुविधा असणार आहे. या रुग्णालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाबद्दल विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले की रुग्णालय असो अथवा सीमा लष्कर कायम तयार असते. 

गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत आपले वीस सैनिक हुतात्मा झाले होते. यात चिनीचे सैनिक मारले गेले होते. त्यानंतर एकीकडे दोन्ही देश लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चर्चा करून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दुसरीकडे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या हालचालीही वाढल्या आहेत. भारतीय लष्करातील अपाचे हेलिकॉप्टर आणि लढाऊ सुखोई विमाने लडाख परिसरात नियमित उड्डाणे करीत आहेत. 

तत्पूर्वी, राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री शहा आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अवघ्या अकरा दिवसांत उभारलेल्या दिल्लीतील या कोविड रुग्णालयास रविवारी भेट दिली. हे रुग्णालय इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ संरक्षण मंत्रालयाच्या जागेवर उभारण्यात आलेले आहे. 

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्‌विट करून याबाबतची माहिती दिली आहे. ट्‌विटमध्ये ते म्हणतात की डीआरडीओ आणि टाटा सन्स यांनी विक्रमी वेळेत 200 आयसीयूसह 1000 बेडचे हे कोविड रुग्णालय उभारले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत या रुग्णालयाची पाहणी केली. 

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील हे कोविड रुग्णालय सशस्त्र दलातील कर्मचारी चालवणार आहेत. 
 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या विषारी साप; खासदार बॅनर्जींची घसरली जीभ

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तुलना विषारी सापाशी केली आहे. बांकुरा येथे इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करताना बॅनर्जी यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. 

तृणमूल काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.  

इंधन दरवाढीस केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी बोलताना खासदार कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, विषारी साप ज्याप्रमाणे माणसांना मारुन टाकतो, त्याप्रमाणे देशातील नागरिक आता मरत आहेत. याला निर्मला सीतारामन या कारणीभूत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com