भाजपचे 'चाचाजान' ओवेसी उत्तर प्रदेशात; आता कोणतीच अडच येणार नाही 

टिकैत म्हणाले की, देशातील सर्वात महाग वीज उत्तर प्रदेशमध्येच आहे.
भाजपचे 'चाचाजान' ओवेसी उत्तर प्रदेशात; आता कोणतीच अडच येणार नाही 
Rajesh Tikait, Asuddin Owaisi .jpg

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका २०२२ मध्ये आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसा पूर्वी अब्बा जान वरुन चांगलाच वाद रंगला होता. आता 'चाचाजान'ची एंट्री झाली आहे. बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर टिका केली. यावेळी, राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ओवैसी यांचा उल्लेख भाजपचे चाचाजान असा केला. (Rajesh Tikait criticizes Asuddin Owaisi) 

टिकैत हे मंगळवारी (१४ सप्टेंबर) मध्यप्रदेशातील बागपतच्या टटीरी गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी टिकैत म्हणाले, भाजपचे 'चाचाजान' असुद्दीन ओवेसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपला विजयाकडे घेऊन जातील. आता कोणतीच अडचण नाही'' असा टोला टिकैत यांनी लगावला. भाजपचे चाचाजान ओवेसी उत्तर प्रदेशात दाखल झाले. त्यामुळे, ओवेसींनी भाजपवर अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली तरीही त्यांच्यावर ओवेसींवर गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण, ते दोघेही एकच टीम आहेत' असा आरोप टिकैत यांनी केला.  

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या टिकैत यांना यावेळी विजेचे दर आणि एमएसपीसंदर्भात निवेदनही दिले. यावेळी टिकैत म्हणाले की, देशातील सर्वात महाग वीज उत्तर प्रदेशमध्येच आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य हमीभाव मिळत नाही. उसासाठी किमान आधारभूत किंमत ही ६५० रुपये प्रति क्विंटल असायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. 

सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत व एमएसपीची हमी द्यावी. यासाठीच आम्ही दिल्लीत धरणे धरून बसलो आहोत. त्यात आता हे देखील समोर येत आहे की, MSP मध्ये मोठा घोटाळा होत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार, व व्यापाऱ्यांच्या मदतीने धान्य आणि गव्हाच्या शासकीय खरेदीमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. रामपूरमध्ये ११ हजार बनावट शेतकऱ्यांनी हे धान्य खरेदी करून पुढे ते काही व्यापाऱ्यांना विकले, असेही टिकैत यांनी सांगितले.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in