राजस्थानात वसुंधराराजेंमुळे गेहलोत सरकार वाचले, या खासदाराने केला गौप्यस्फोट  - In Rajasthan, Vasundhara Raje saved the Gehlot government | Politics Marathi News - Sarkarnama

राजस्थानात वसुंधराराजेंमुळे गेहलोत सरकार वाचले, या खासदाराने केला गौप्यस्फोट 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

जर असे असेल तर गेहलोत सरकार कोसळणे शक्‍य होते का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

जयपूर : राजस्थानात जेव्हा सचिन पायलट यांनी बंड केले होते त्यावेळी मी भाजपला पाठिंबा दिला होता पण, वसुंधराराजेंनी हे सरकार कोसळू दिले नाही असा गंभीर आरोप खासदार हुनमान बेनिवाल यांनी केला आहे. 

कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. त्यावेळी हे सरकार पडले असते. वीस आमदार पायलट यांच्याबरोबर होते. आमच्या पक्षाने पायलट आणि भाजपला पाठिंबा देऊ केला होता.

आम्ही शंभरटक्के पायलटांबरोबर होतो.मात्र माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या वसुंधराराजे यांनी अशोक गेहलोतांना आश्‍वासन दिले होते की तुमचे सरकार पडू देणार नाही. आपल्या पक्षातील वीस आमदारांना पाठिंबा देण्यास सांगितले होते असेही खासदार बेनियाल यांनी म्हटले आहे. 

जर असे असेल तर गेहलोत सरकार कोसळणे शक्‍य होते का ? असा सवालही त्यांनी केला आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांची युती आहे असा गौप्यस्फोटही बेनिवाल यांनी केला आहे. 

सचिन पायलट यांनी काही महिन्यापूर्वी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते आणि आपल्या समर्थक आमदारांना हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यावेळी पायलट यांच्यावर गेहलोत यांनी जोरदार टीकस्त्र सोडताना त्यांना निकम्माही म्हटले होते. या राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊनही या दोन्ही नेत्यांमध्ये अबोला होता. पायलट हे सत्ता येण्यापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी पक्षासाठी मोठी मेहनत घेतली होती. मात्र सत्ता येताच पक्षनेतृत्वाने अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केले. त्यावेळीच पायलट हे नाराज झाले होते. 

शेवटी त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. मात्र नाराजी काय राहिली होती. पायलट यांनाही गेहलोत पाण्यात पाहत होते. त्यांचे होता होईल तितके खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात गेला अशी गेहलोतांविरोधात तक्रार होती. 

पायलट यांच्या बंडानंतर गेहलोत सरकार कोसळेल असे वाटत होते. पण, बऱ्याच घडामोडी घडल्या. कॉंग्रेसला नाराज पायलटांचे मन वळविणे शक्‍य झाले त्यामुळे गेहलात सरकार तरले. हे जरी खरे असले तरी अजूनही या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त संघर्ष सुरूच आहे. 

यासर्व घडामोडी घडत असताना खासदार बेनियाल यांनी वसुंधराराजेंना लक्ष्य केले आहे. त्यांच्यामुळे गेहलोत सरकार वाचले. येथे राजे आणि गेहलोत यांची युती असल्याचे म्हटले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख