राजस्थान सरकारला अस्थिरतेचे हादरे...पायलट 22 आमदारांसह दिल्लीत...

उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे 22आमदारांसह दिल्ली येथे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान कॅाग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे
1gehlot_pilot.jpg
1gehlot_pilot.jpg

जयपूर : राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारला आता आपल्या आमदारांवर कडक नजर ठेवावी लागत आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे 22आमदारांसह दिल्ली येथे पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान कॅाग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की भारतीय जनता पक्ष त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी राज्यातील भाजपचे नेतृत्व केंद्राच्या इशारानुसार आमदार खरेदीच्या घोडेबाजार करीत आहेत. त्यासाठी कॅाग्रेसच्या आमदारांना 10-10 कोटी रूपयांची ऑफर भाजप देत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला आहे.

 
राजस्थान कॅाग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे याबाबत माध्यमांशी बोलतांना अशोक गेहलोत म्हणाले, ''मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अनेकांची असते. आमच्या पक्षात पाच ते सात जण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पण जेव्हा पक्ष निर्णयानुसार एक जण मुख्यमंत्री होतो तेव्हा अन्य जण त्याला पाठिंबा देत असतात. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. शांतता आहे.'' 

''जेव्हा एकाला मुख्यमंत्री केले जाते तेव्हा अन्य इच्छुकांनी शांत बसणे अपेक्षीत असते,'' असे सांगत अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांना प्रदेश अध्यक्ष व उपमुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचा दबाब आणू शकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे झाले तर राजस्थानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. 

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलविली होती. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीला गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक मुद्दावर आपले मत मांडले पण सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत अनेक प्रश्न निर्माण केले. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील 22 आमदार हे सध्या दिल्लीत आहेत. हे आमदार पक्षश्रेष्ठींकडे पक्षातील अंतर्गत तक्रारी मांडणार आहेत.    

शनिवारी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या बैठकीनंतर आमदार जितेंद्र सिंह म्हणाले की त्यांनी गेहलोत यांना पाठिंबा दिले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. परंतु उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षात सारे काही सुरळीत नसल्याचे सांगितले आहे.  राजस्थान पोलिसांनी स्पेशन ऑपरेशन ग्रुपने सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी भाजपचे नेते भरत मालानी आणि अशोक सिंह यांना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडीत देण्यात आली आहे. राजस्थानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजस्थानमधीस सीमा सील करण्यात आल्या आहेत. याबाबत गृहमंत्रालयाने आदेश दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.  
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com