आधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह - Rajasthan Chief Minister Ashok Gehlot corona positive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आधी पत्नी नंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पॅाझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

अशोक गेहलोत यांनी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतले आहेत.

जयपूर: राजस्थानचे Rajasthan मुख्यमंत्री अशोक गेहलोत Ashok Gehlot यांचा कोरोना अहवाल Coronavirus पॅाझिटिव्ह आला आहे. अशोक गेहलोत सध्या घरी विलगीकरणात आहे. अशोक गेहलोत यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. 

"माझी कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आली आहे. मला कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत. माझी तब्बेत उत्तम आहे. सध्या मी कोरोना नियमांचे पालन करीत आहे. मी होम क्वारंटाइन आहे. माझे काम करीत आहे," असे टि्वट गेहलोत यांनी केलं आहे. बुधवारी त्यांची पत्नी सुनीता गेहलोत यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी टि्वट करुन माहिती दिली होती. 

अशोक गेहलोत यांनी कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये पहिला तर मार्चमध्ये दुसरा डोस घेतला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिंरजीव खासदार दुष्यंत सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जयपूरचे आमदार अशोक लाहोटी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पॅाझिटिव्ह आढळले आहे.  

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे.  गेल्या २४ तासात राजस्थानमध्ये सुमारे १७ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.  गेल्या २४ तासात ८ हजार ३०३  जण कोरोनामुक्त झाले आहेत. ता. ३मे नंतर राजस्थानमध्ये १५ दिवसांचा लॅाकडाउन वाढविण्याची शक्यता आहे.    
 
खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण 
 
राज्यसभेचे खासदार तथा गुजरात राज्याचे प्रभारी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना आज रात्री मुंबई येथील लिलावती हाँस्पीटल मध्ये हलविण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी गुरुवारी २२ रोजी ट्विट करून दिली होती. त्यानंतर  त्यांना पुणे येथील जहाँगीर हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले . येथे तज्ञ डॉक्टरा मार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मुंबईच्या लिलावती हाँस्पीटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.  मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईला उपचारासाठी आज रात्री नेण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख