'रक्षककर्तेच झाले भक्षक'..बलात्कारीत युवतीकडून शरीरसुखाची मागणी..पोलिस अधिकाऱ्याला अटक - rajasthan acb trap police officer posted in jaipur seeks womans honor in exchange for bribe | Politics Marathi News - Sarkarnama

'रक्षककर्तेच झाले भक्षक'..बलात्कारीत युवतीकडून शरीरसुखाची मागणी..पोलिस अधिकाऱ्याला अटक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

कैलाश बोहरा हा महिला अत्याचार प्रतिंबधक विभागात प्रभारी सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. 

जयपुर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. 'रक्षककर्ते कसे भक्षक' असू शकतात, यांचे उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे. बलात्काराच्या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने युवतीकडून पैशांची मागणी केली होती, तिनं पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. 

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बी.एल. सोनी यांच्या आदेशानुसार सापळा रचून संबधित अधिकाऱ्याला अटक केली आहे. राजस्थान पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी कैलाश बोहरा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बलात्कार प्रकरणातील पीडीत युवतीला तपासासाठी कैलाश बोहरा नेहमी आपल्या कार्यालयात बोलवित असे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याने संबधित युवतीकडून शरीऱसूखाची मागणी केली होती. कैलाश बोहरा हा जयपूर येथील महिला अत्याचार प्रतिंबधक विभागात प्रभारी सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. 

एसीबीचे महासंचालक बी.एल. सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ता. 6 मार्च रोजी तीस वर्षीय युवतीने एका युवकाच्या विरोधात जवाहर सर्कल येथे बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणाचा तपास कैलाश बोहरा हा करीत होता. आरोपींना शिक्षा कऱण्यासाठी त्याने या युवतीकडून सुरवातीला पैशांची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिच्याकडे बोहरा याने शरीरसुखाची मागणी केली. तसेच कार्यालयीन कामकाजा व्यक्तिरिक्त बोहरा याने तिला अन्य ठिकाणी भेटण्यास बोलविले होते. कैलास बोहरा यांच्याविरोधात त्या युवतीने एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानंतर काल (ता.14) ती युवती बोहरा यांच्या कार्यालयात आली असता एसीबीच्या पथकाने सापळा रचून बोहरा याला रंगेहाथ पकडले. 

हेही वाचा : बिजली मल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन 

सांगली : प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा परिवार आहे.  एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र कर्नाटक पंजाब हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख